गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर हा चांगलाच चर्चेत आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘अॅनिमल’ या चित्रपटामुळे अभिनेत्याची चांगलीच चर्चा सुरु आहे. अजूनही काही प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने जवळपास ९०० कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. यानंतर त्याच्या अनेक चाहत्यांना रणबीर च्या आगामी चित्रपटाची उत्सुकता लागली होती. (Ranbir Kapoor And Rohit Shetty)
अशातच रणबीर कपूरचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो पोलिसांच्या गणवेशात पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या व्हायरल फोटोमध्ये रणबीरचा नवीन लूक समोर आला आहे. या फोटोमधील पोलिसाच्या लूकबरोबच त्याच्या मोठ्या मिशांना पाहून चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत. रणबीरचा हा खास लूक पाहून अनेकांनी तो रोहट शेट्टीच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र रणबीर व रोहित हे त्यांच्या आगामी चित्रपटसाठी नाही तर एका जाहिरातीसाठी एकत्र आल्याचे म्हटले जात आहे.
पण रणबीरला या खास लूकमध्ये पाहून त्याच्या चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे. रणबीर व रोहित हे दोघे एकत्र चित्रपट नाही तर जाहिरात करत असल्यामुळे अनेकांनी निराशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर या व्हायरल फोटोमुळे अनेकांनी रणबीरला लवकरच या लूकमध्ये पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर अनेकांनी रोहित व रणबीर यांनी मिळून असाच काहीसा चित्रपट घेऊन येण्याची विनंतीही केली आहे. तसेच या व्हायरल फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसादही दिला आहे.
दरम्यान, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलीस फोर्स’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी व विवेक ओबेरॉयसारखे हे कलाकार दिसणार आहेत. तर रणबीर सध्या ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. अजूनही काही चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट चालू असल्याचे म्हटले जात आहे.