मंगळवार, सप्टेंबर 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कोणी दहशतवादी हल्ल्यामध्ये गेलं तर कोणाला झाला गंभीर आजार, ‘या’ कलाकारांच्या भावडांचा झाला होता दुर्देवी मृत्यू

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 10, 2023 | 8:30 am
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
Some artist’s cousin died tragically

Some artist’s cousin died tragically

करोना काळात अनेकांना आपल्या जवळच्या मंडळींना अखेरचा निरोप द्यावा लागला. काहींना तर आपल्या नात्यातीलच व्यक्तींना शेवटचं पाहताही आलं नाही. तो काळ प्रत्येकासाठी खूप कठीण होता. पण माणूस म्हटलं की जसं जीवन आहे तसं मरणही आहे. करोना काळात बरीच माणसं आपल्या आपुलकीच्या माणसांना अर्धावर सोडून गेली. काही कलाक्षेत्रातील कलाकारही या काळामध्ये कलाविश्वाने गमावले. कोण आहेत हे कलाकार ज्यांनी आपल्या भावंडांना गमावलं जाणून घेऊया. निक्की तांबोळी ही एक अभिनेत्री आहे जिने हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले. ती ‘बिग बॉस’च्या १४व्या पर्वाची द्वितीय स्तराची विजेता ठरली होती. निक्कीवर या काळात दुःखाचा डोंगर कोसळला होता. निक्कीच्या भावाचं करोना काळात निधन झालं होतं. तिच्या कुटुंबासाठी ही सर्वात कठीण वेळ होती.(Some artist’s cousin died tragically)

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

आणखी वाचा – “केस परत आले”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची पोस्ट, काही दिवसांपूर्वीच कापले होते केस पण…

त्याची तब्येत बरीच बिघडत गेली. उपचार करुनही त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. हळूहळू त्याची तब्येत खालावत गेली आणि करोनातच त्याचं निधन झालं.दुसरे कलाकार मुकेश खन्ना ज्यांना आपण सगळ्यांनी शक्तिमानाच्या रुपात पाहिलं आहे. त्यांनी ही भूमिका साकारत प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली होती. त्यांनी पडद्यावर शक्तिमान बनून सगळ्यांना वाचवलं पण ते स्वतःच्या बहिणीला वाचवू शकले नाहीत. त्यांनीही त्यांच्या बहिणीला गमावलं. त्यांच्या बहिणीला फुफ्फुसाचा आजार होता. फुफ्फुसात रक्तसंचय झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.अभिनेता आशिष चौधरी हिंदी चित्रपट जगतातील तसेच मालिकांमधील नावाजलेला चेहरा आहे. त्याने आजपर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mukesh Khanna (@iammukeshkhanna)

आणखी वाचा – “सर्व सीमा ओलांडून…”, ‘ताली’मध्ये तृतीयपंथीयाची भूमिका साकारल्यानंतर सुव्रत जोशीची पोस्ट, म्हणाला, “आयुष्य किती कठोर…”

पण त्याने या सगळ्यात दुःखही भोगलं आहे. आशिषने मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या बहिणीला गमावलं होतं. मुंबईत झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यात अनेक जणांनी आपला प्राण गमावला होता. त्यात आशिषची बहिणही होती. मोनिका व तिचा पती या हल्ल्यात मारले गेले होते.
हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे माही विज. तिने आजपर्यंत बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती टीव्ही जगतातून दूर आपल्या कुटुंबासह आनंदात वेळ घालवत आहे. पण एक काळ होता जेव्हा माहीवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. माहीने २०२१ला आपल्या भावाला गमावलं होतं.

View this post on Instagram

A post shared by Mahhi Vinod Vij (@mahhivij)

आणखी वाचा – ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंताने घेतलं नवं घर, सोशल मीडियावर पूजा करतानाचे फोटो व्हायरल

कोरोनाच्या काळात तिचा भाऊ ही या आजाराच्या विळख्यात सापडला आणि त्याची तब्येत बिघडत गेली. त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
हिंदी मालिकांमध्ये ज्याने आपली वेगळी अशी जागा निर्माण केली असा अभिनेता म्हणजे फहमान खान. त्याने आजपर्यंत विविध मालिकांमध्ये काम करत त्याने या क्षेत्रात आपला जम बसवला. पण या सगळ्यात त्याने आपल्या भावाला गमावण्याचंही दुःख सहन केलं. फहमानचा भाऊ फराज हा देखील अभिनेता होता. पण त्याला मोठा आजार झाला होता. ब्लॅक फंगसमुळे त्याने आपला जीव गमावला. २८ दिवस त्याने रुग्णालयामध्ये काढले. पण त्याचा जीव वाचला नाही.

Tags: artist’s cousin died tragicallyashish choudharihindi actorhindi actressmahi vijmukesh khannanikki tamboli
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Next Post
Samir Choughule on Hasyajatra USA Tour

"कार्यक्रम पाहण्यासाठी जेव्हा अमेरिकेत…", समीर चौघुलेने सांगितला अमेरिकेतील 'त्या' प्रवासाचा अनुभव, म्हणाला, "मराठी माणूस कुठेही जा"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.