शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कार्यक्रम पाहण्यासाठी जेव्हा अमेरिकेत…”, समीर चौघुलेने सांगितला अमेरिकेतील ‘त्या’ प्रवासाचा अनुभव, म्हणाला, “मराठी माणूस कुठेही जा”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 10, 2023 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Samir Choughule on Hasyajatra USA Tour

"कार्यक्रम पाहण्यासाठी जेव्हा अमेरिकेत…", समीर चौघुलेने सांगितला अमेरिकेतील 'त्या' प्रवासाचा अनुभव, म्हणाला, "मराठी माणूस कुठेही जा"

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात विविध प्रकारचे टेन्शन असतात. त्या टेन्शनवर एकच उपाय असतो, तो म्हणजे मनसोक्त हसण्याचा. आणि हा विडा उचलला आहे छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’. गेल्या पाच वर्षांपासून हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांना मनमुराद हसवत आला आहे. विविध विषयांवर आधारित स्किट्स, कलाकारांचे दमदार सादरीकरण यांमुळे हा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांचा लाडका बनला असून कार्यक्रमातील प्रत्येक कलाकारांचा आज मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. असाच एक कलाकार जो नेहमीच बऱ्याच वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवत आला आहे, तो म्हणजे अभिनेता समीर चौघुले. (Samir Choughule on Hasyajatra USA Tour)

समीरसह हास्यजत्रेतील सर्वच कलाकारांनी दोन महिन्यांचा ब्रेक घेतला होता. त्यातील काही कलाकारांनी अमेरिकेचा दौरा केला होता. त्यांच्या या दौऱ्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. तसेच दौऱ्यावेळी चाहत्यांच्या आदरातिथ्याने देखील कलाकार भावुक झाल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.

अमेरिकेचा दौरा गाजवल्यानंतर प्रेक्षकांचा हा लाडका कार्यक्रम छोट्या पडद्यावर पुन्हा परतला आहे. सध्या हा कार्यक्रम सुरु असून त्यांच्या आताच्या एपिसोडसना चांगला प्रतिसाद मिळत आहे. हास्यजत्रेतील कलाकार त्यांचे अमेरिकेतील किस्से शेअर करत असून याच दौऱ्यातील एक किस्सा समीरने ‘इट्स मज्जा’ सोबत शेअर केला आहे. समीर व अन्य कलाकारांना अमेरिकेतील प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले असून प्रेक्षकांच्या या प्रेमाचे वर्णन करताना समीर भारावून गेला होता.

पाहा काय म्हणाला समीर चौघुले अमेरिकेतील प्रेक्षकांबद्दल ? (Samir Choughule share a experience during Maharashtrachi Hasyajatra USA Tour)

‘इट्स मज्जा’शी संवाद साधताना समीर चौघुलेने अमेरिकेतील प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल बोलला. समीर म्हणाला, “महाराष्ट्रात अनेक मराठी कार्यक्रम पाहायला मिळतात, पण अमेरिकेत तिकडे जास्त चॅनेल्स नसल्यामुळे हे कार्यक्रम पाहायला मिळत नाही. त्यातही तिथली बहुतेक लोक हास्यजत्रा बघतात. त्यामुळे त्यांना एक मराठी लोकप्रिय कलावंत जो त्यांचा घरचा सदस्य झाला आहे, रोज आम्हाला टीव्हीवर बघतात. ते आमचा कार्यक्रम पाहण्यासाठी जेव्हा अमेरिकेत आले, तेव्हा त्यांचा उत्साह द्विगुणित होतो.”

हे देखील वाचा – ‘सुभेदार’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई, पाच दिवसांमध्ये कमावले इतके कोटी, प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव

अमेरिकेतील त्या प्रवासाबद्दल सांगताना समीर म्हणाला, “आमचा प्रवासात खूप वेळ गेला. न्यूयॉर्क एअरपोर्टला वादळ आल्यामुळे आमची फ्लाईट कॅन्सल झाली होती. त्यामुळे आम्ही कॅनडाहून रस्तेमार्गाने ९ तासांचा प्रवास करून अमेरिकेत पोहोचलो. आमचा ४ वाजेचा प्रयोग होता, तो रात्री ८.३० वाजता सुरु झाला. अमेरिकेतील प्रेक्षक साडेचार तास कधीच थांबत नाही, पण ते या कार्यक्रमाच्या प्रेमाखातर थांबले होते. तर हाच मुद्दा आहे की, आमच्यासाठी तब्बल साडेचार तास ही लोक थांबली. खरंतर आम्ही तिथे पोहोचल्यावर त्यांना सांगितले पाहिजे की, प्रयोग सुरु करतोय. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही थोडा वेळ आराम करा, आम्ही थांबतो. आम्हां सर्वांना भरून आलं होतं. पुढे कार्यक्रमादरम्यान आमच्या सर्वच स्किट्सना प्रेक्षकांचा स्टँडिंग ओव्हेशन मिळाला होता. तेव्हा ते बघून काही क्षणासाठी आमच्या डोळ्यात पाणी आलं. मी एक गोष्ट नक्की सांगतो की, मराठी माणूस जगभरात कुठेही जा, पण मराठी कलाकारांवर प्रेम करणं कधीच सोडत नाही.” हा किस्सा सांगताना समीर फार भारावून गेला. (Samir Choughule share a experience during Maharashtrachi Hasyajatra USA Tour)

Tags: hasya jatra in usamaharashtrachi hasya jatrasamir choughulesony marathi
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Prasad oak talk about him work

सलग ९६ तास काम, झोपलाही नाही अन्…; प्रसाद ओकने सांगितलेला ‘तो’ प्रसंग, म्हणालेले, “त्याक्षणी असं वाटलं की…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.