आजवर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड केलं आहे. हास्यजत्रेतील प्रत्येक कलाकाराने आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. प्रत्येक कलाकाराचा असा स्वतःचा चाहतावर्ग आहे. अशाच हास्यजत्रेतील एका सगळ्यांना हसवत खेळवत राहणाऱ्या कलाकाराने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना धक्का देणारी बातमी दिली. हा कलाकार म्हणजे गौरव मोरे. आजवर गौरवने त्याच्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकवर्ग जमवला आहे. (Gaurav More New Look)
काही कलाकारांची त्यांची अशी एक विशिष्ट स्टाईल असते. कपडे, हेअरस्टाईल किंवा अभिनयाची स्टाईल ही कलाकार मंडळी त्यांच्या कामाबरोबरच त्यांच्या त्या स्टाइलसाठी देखील प्रसिद्ध असतात. स्टाईलसाठी लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये गौरव मोरेचं नाव देखील घेतलं जात. गौरव त्याच्या विनोदीशैलीमुळे जितका प्रसिद्ध आहे तितकाच त्याच्या हेअरस्टाईलसाठी ओळखला जातो. त्याचे मानेपर्यंत वाढवलेले केस ही गौरवची खास ओळख होती. हास्यजत्रेच्या मंचावर स्कीटदरम्यान तो ‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ असं म्हणत एन्ट्री घ्यायचा आणि ही एन्ट्री त्याच्या केसांच्या स्टाइलमुळेच हिट ठरायची.
मात्र गौरवने वाढवलेले केस कापून साऱ्या चाहत्यांना धक्का दिला. याबाबत ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तो म्हणाला की, ‘परिनिर्वाण’ या चित्रपटात भूमिका साकारणार आहे आणि त्या भूमिकेची गरज म्हणूनच मी केस कापले आहेत.”
गौरवने दिलेल्या या वाईट धक्क्यांनंतर त्याने इन्स्टाग्राम स्टोरीला एक फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. गौरवने ‘केस परत आले’ म्हणत एक फोटो पोस्ट केला आहे. यांत त्याचे पूर्वीप्रमाणे केस असलेले पाहायला मिळत आहेत. गौरवची खरी ओळख ही त्याच्या हेअरस्टाईलमुळे होती. ती हेअरस्टाईल परत आल्याची खुशखबर गौरावने चाहत्यांना दिली आहे. गौरवचा नवा लूक प्रेक्षकांना आवडला जरी असला तरी ते गौरवच्या जुन्या लूकला मिस करत होते. अशातच गौरवने चाहत्यांना त्याचा जुना लूक परत आला असल्याचं सांगत खुशखबर दिली आहे.