सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर उर्फी जावेद ही नेहमी चर्चेत असते. तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच तिच्याबद्दल चर्चा होताना दिसते. तिने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र तिला अभिनेत्री म्हणून कधीही ओळख मिळाली नाही. तिच्या अतरंगी कपड्यांवरुन तिला अनेकदा ट्रोलदेखील केले. मात्र तिने कधीही या सगळ्या ट्रॉलिंगकडे लक्ष दिले नाही. सोशल मीडियावर उर्फीचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण कोणत्याही अतरंगी कंपड्यांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे तिच्याबद्दल बोलले जात आहे. (Uorfi Javed webseries trailer)
आता लवकरच उर्फीच्या जिवनावर एक वेबसीरिज येणार आहे. ज्यामुळे जी उर्फी लोकांना माहीत ती जाणून घेण्यास मदत होणार आहे. ‘फॉलो कर यार’ असे या वेब सीरिजचे नाव असून यामध्ये उर्फी अनेक कलाकारांबरोबरचे तसेच कुटुंबातील अनेक किस्से सांगतानादेखील दिसणार आहे.
उर्फीला सोशल मीडियावर कितीही ट्रोल केले तरीही प्रत्येकाला तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण उर्फीला ओळखतात. अनेक सिने कलाकारांनीही उर्फीच्या फॅशनची प्रशंसा केली आहे. आता वेब सीरिजच्या माध्यमातून तिच्याबद्दल जाणून घेता येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. समोर आलेल्या ट्रेलरमध्ये कुटुंब, संघर्ष आणि आयुष्यातील अनेक किस्से सांगताना उर्फी दिसत आहे.
यामध्ये उर्फीच्या बहिणी तिला वेडी म्हणत आहेत तर आई म्हणते की हे घर उर्फीच्या पैशांमुळे चालत आहे. त्यामुळे अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्यामुळे उर्फीबद्दल माहीत नसलेल्या गोष्टीदेखील समजणार आहेत. काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये उर्फी म्हणते की, “मी नेहमीच मोठी स्वप्न पाहिली आहेत. मी मरेन किंवा सगळ्यांनाच वेडं करेन. माझ्या बहीणींबरोबर माझं भांडणदेखील होतं. येत्या पाच वर्षात मला खूप मोठं व्हायचं आहे. तसेच भारताची कीम कर्दाशियन बनायचे आहे”. ‘फॉलो कर यार’ वेब सीरिजमध्ये ऑरी, मुनव्वर फारुकी असून ते उर्फीचे कौतुक करताना दिसत आहेत. नऊ एपिसोडची सीरिज २३ ऑगस्टला ॲमेझॉन प्राइमवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.