शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नवऱ्याच्या वाढदिवसाला गौतमी देशपांडेने शेअर केला सगळ्यात सुंदर व्हिडीओ, दिलं महागडं गिफ्ट, एकमेकांवर आहे जीवापाड प्रेम

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 17, 2024 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gautami Deshpande husband birthday

गौतमी देशपांडेने शेअर केलेला लग्नाचा व्हिडीओ चर्चेत

मराठी मनोरंजन क्षेत्रातील गौतमी देशपांडे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘माझा होशील ना?’ या मालिकेमुळे ती अधिक प्रकाशझोतात आली. सध्या गौतमी अभिनयापासून दूर असलेली पाहायला मिळते. मागील वर्षी ती सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघांचाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार व मित्रमंडळीनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते आणि त्यांना चाहत्यांची खूप पसंतीदेखील मिळाली होती. (Gautami Deshpande husband birthday)

गेल्या वर्षी २५ डिसेंबरला दोघांनी लग्नगाठ बांधली. मेहंदी, संगीत, सप्तपदी, रिसेप्शन असे लग्नाचे अनेक सोहळे मोठ्या थाटामाटात पार पडले. पण आता लग्नानंतर गौतमीने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला एक खास सरप्राइज दिले आहे. सोशल मीडियावर तिने एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्यांनी प्रेमाची सुरुवात ते लग्न हा प्रवास कसा होता? हे सांगितले आहे.

आणखी वाचा – एकीकडे पूर्वाश्रमीची पत्नी देश सोडून गेली, तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नव्या अफेअरची चर्चा, ‘त्या’ फोटोंमध्ये दिसलं सत्य

View this post on Instagram

A post shared by Gautami Deshpande (@gautamideshpandeofficial)

गौतमीने शेअर केलेला व्हिडीओ हा खूपच सुंदर असून या व्हिडीओमध्ये गौतमी व स्वानंद यांच्या प्रेमाची सुरुवात नक्की काशी झाली? कोणी कोणाला प्रपोज केले? याबद्दल सांगताना दिसत आहेत. तसेच लग्नसमारंभामध्ये मृण्मयी देशपांडेने केलेली धमाल आणि मित्र मैत्रिणींचा कल्ला असे सगळे काही दाखवण्यात आले आहे. यामध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “तो लहान आहे लोक उगाच…”, निक्कीशी जवळीक असण्यावरुन छोटा पुढारीची आई रडत म्हणाली, “आम्ही शेतकरी म्हणून…”

तिने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनदेखील दिले आहे. या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की, “मी विचार करत होते की तुझ्याबरोबरचे काही फोटो शेअर करावे. पण नंतर मी विचार केला की आपल्या लग्नाचा खास व्हिडीओ शेअर करुन तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा का देऊ नये? वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा My Love”. दरम्यान या व्हिडीओला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे. गौतमीने शुभेच्छा दिल्यानंतर स्वानंदची पोस्टदेखील चर्चेत आली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये स्वानंदी झोपलेली दिसत आहे तसेच वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून तिने आयफोन दिल्याबद्दल तिचे आभारदेखील मानले आहेत.    

Tags: gautami deshpandeswanand tendulkarwedding video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Bigg Boss Marathi 5 Paddy aka Pandhrinath Kamble emotional for talking with late mother on the phone

Bigg Boss Marathi : "माझ्या हातावर तू जीव सोडलास आणि…", आईला फोन करत ढसाढसा रडला पॅडी, म्हणाला, "यश बघायची वेळ आली तेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.