मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या गायिकांमध्ये अनुराधा पौडवाल यांचे नाव घेतले जाते. ८० व ९० च्या दशकामध्ये त्यांनी आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. १९७३मध्ये त्यांनी संगीतक्षेत्रामध्ये आपले करिअर सुरू केले.त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. पण आता त्या त्यांच्या गाण्यामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आता राजकारणात प्रवेश केल्याचे वृत्त हाती आले आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Singer Anuradha Paudwal in politics)
मिळालेल्या माहितीनुसार, अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांनी भाजप सदस्यत्त्वाची शपथ ग्रहण केली आहे. यावर अनुराधा यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे खुश असल्याचेही सांगितले आहे. याबद्दल त्यांनी माध्यमांबरोबरही संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “मला या सरकारमध्ये सामील झाल्याचा खूप आनंद आहे. भाजपचा हिंदू धर्माशी खूप जवळचा संबंध आहे. मी या पक्षांमध्ये सहभागी होणे हे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे”. त्यानंतर त्यांना विचारले की, “तुम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडणूका लढवणार का?”, त्यावर त्या म्हणाल्या की, “मला याबद्दल काही कल्पना नाही. पक्ष मला जे सांगेल त्यावर मी काम करेन”.
#WATCH | Delhi | On joining BJP, singer Anuradha Paudwal says, "I am happy that I am joining the government which has a deep connection with Sanatan (Dharma). It is my good fortune that I am joining BJP today." pic.twitter.com/oeF82icr6a
— ANI (@ANI) March 16, 2024
भाजपमध्ये अनुराधा यांना मोठी जाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच स्टार प्रचारक म्हणूनही त्या काम पाहतील अशीही माहिती मिळाली आहे. पण त्यांच्या प्रवेशानंतर त्यानं पक्षात नेमकी कोणती जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनुराधा पौडवालांनी अनेक भाषांमध्ये अनेक गाणी व भजनं गायली आहेत. कर्नाटकमधील कारवार येथे त्यांचा जन्म झाला. तेव्हा त्या केवळ १९ वर्षाच्या होत्या. त्यांनी १९६९ मध्ये अरुण पौडवाल यांच्याशी विवाह केला. अरुण पौडवाल एसडी बर्मन यांचे सहाय्यक व संगीतकार होते. अरुण व अनुराधा यांना आदित्य व कविता अशी दोन मुलं आहेत. १९९१ मध्ये अरुण यांचा अपघाती मृत्यू झाला. ‘अभिमान’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदाच जया भादुरी यांच्यासाठी श्लोक गायला होता. त्यांचा आता आराजकारणातील प्रवास कसा असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.