शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘स्क्विड गेम’ फेम ओह येओंग सूवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा अन्…

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 16, 2024 | 1:16 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Squid Game fame Oh Yeong Soo sentenced to 8 months in prison after serious allegations of sexual abuse

‘स्क्विड गेम' फेम ओह येओंग सूवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा अन्...

काही दिवसांपूर्वी आलेली ‘स्क्विड गेम’ ही लोकप्रिय वेबसीरिज चांगलीच गाजली होती. ‘स्क्विड गेम’ या सीरिजची भारतासह जगभरात प्रचंड चर्चा झाली होती. ही सीरिज चांगलीच नावाजली गेली होती. तसेच यातील कलाकारदेखील विशेष चर्चेत आले होते. अशातच आता या सीरिजमधील एक अभिनेता एका कारणामुळे चर्चेत आला आहे. ‘स्क्विड गेम्स’मध्ये नंबर १ खेळाडूच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता ओह येओंग सूवर दक्षिण कोरियामध्ये लैंगिक शोषण प्रकरणात दोषी आढळला आहे.

काही वर्षांपूर्वी दक्षिण कोरियाच्या या अभिनेत्यावर एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हे प्रकरण लक्षात घेऊन ‘स्क्विड गेम’ अभिनेत्याला आठ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणामुळे ओह येओंग सूचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. ‘स्क्विड गेम’ प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेता या प्रकरणामुळे चर्चेत होता. पण २०२१ मध्ये ओह येओंग सूविरुद्ध खटला दाखल करण्यात आला. मात्र, त्या अभिनेत्यावर कोणतीही कठोर कारवाई झाली नाही.

View this post on Instagram

A post shared by IGN (@igndotcom)

आणखी वाचा – अमेय खोपकर यांच्या लेकाचंही कलाक्षेत्रामध्ये पदार्पण, मुलाचे कौतुक करत म्हणाले, “पहाटे पाच वाजता उठून शूटला…”

७९ वर्षीय अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चौकशीही सुरु झाली. तथापि, अभिनेत्याने त्याच्यावरील आरोपांचे स्पष्टपणे खंडन केले होते. मात्र पुन्हा तपास सुरु झाल्यानंतर १५ मार्च २०२४ रोजी, सुवॉन जिल्हा न्यायालयाच्या सेओंगनाम शाखेने त्याला या प्रकरणात दोषी ठरवले. या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर अभिनेत्याला आठ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि दोन वर्षांसाठी निलंबितदेखील करण्यात आले आहे.

आणखी वाचा – मुनव्वर फारुकीबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल फोटोमुळे एल्विश यादवने मागितली माफी, म्हणाला, “सनातन धर्मासाठी…”

दरम्यान, २०२१ मध्ये आलेल्या ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजमुळे अभिनेता ओह येओंग सू चांगलाच प्रसिद्धी झोतात आला. त्यात त्याचे नाव ओह इल होते. त्याचबरोबर त्यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारही मिळाला होता.  

Tags: entertainment newsOh Yeong SooSquid Game
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Pulkit Samrat Kriti Kharbanda Wedding

क्रिती खरबंदा-पुलकित सम्राट यांचा शाही विवाहसोहळा संपन्न, अभिनेत्याच्या शेरवानीवर संस्कृत भाषेमध्ये मंत्र, सुंदर फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.