सोमवार, जून 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 16, 2024 | 3:12 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Singer Anuradha Paudwal in politics

Video : सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या गायिकांमध्ये अनुराधा पौडवाल यांचे नाव घेतले जाते. ८० व ९० च्या दशकामध्ये त्यांनी आपल्या गायनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. १९७३मध्ये त्यांनी संगीतक्षेत्रामध्ये आपले करिअर सुरू केले.त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. पण आता त्या त्यांच्या गाण्यामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आता राजकारणात प्रवेश केल्याचे वृत्त हाती आले आहे. यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Singer Anuradha Paudwal in politics)

मिळालेल्या माहितीनुसार, अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांनी भाजप सदस्यत्त्वाची शपथ ग्रहण केली आहे. यावर अनुराधा यांनी पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे खुश असल्याचेही सांगितले आहे. याबद्दल त्यांनी माध्यमांबरोबरही संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “मला या सरकारमध्ये सामील झाल्याचा खूप आनंद आहे. भाजपचा हिंदू धर्माशी खूप जवळचा संबंध आहे. मी या पक्षांमध्ये सहभागी होणे हे माझ्यासाठी सौभाग्याचे आहे”. त्यानंतर त्यांना विचारले की, “तुम्ही येणाऱ्या काळामध्ये निवडणूका लढवणार का?”, त्यावर त्या म्हणाल्या की, “मला याबद्दल काही कल्पना नाही. पक्ष मला जे सांगेल त्यावर मी काम करेन”.

आणखी वाचा – ‘स्क्विड गेम’ फेम ओह येओंग सूवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून आठ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा अन्…

#WATCH | Delhi | On joining BJP, singer Anuradha Paudwal says, "I am happy that I am joining the government which has a deep connection with Sanatan (Dharma). It is my good fortune that I am joining BJP today." pic.twitter.com/oeF82icr6a

— ANI (@ANI) March 16, 2024

भाजपमध्ये अनुराधा यांना मोठी जाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच स्टार प्रचारक म्हणूनही त्या काम पाहतील अशीही माहिती मिळाली आहे. पण त्यांच्या प्रवेशानंतर त्यानं पक्षात नेमकी कोणती जबाबदारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

आणखी वाचा – फ्लॉप चित्रपटांनंतर सारा अली खानला चित्रपटसृष्टीमधूनच विचित्र वागणूक, अभिनेत्रीनेच बोलून दाखवलं, म्हणाली, “पार्टीलाही बोलवत नाही आणि…”

अनुराधा पौडवालांनी अनेक भाषांमध्ये अनेक गाणी व भजनं गायली आहेत. कर्नाटकमधील कारवार येथे त्यांचा जन्म झाला. तेव्हा त्या केवळ १९ वर्षाच्या होत्या. त्यांनी १९६९ मध्ये अरुण पौडवाल यांच्याशी विवाह केला. अरुण पौडवाल एसडी बर्मन यांचे सहाय्यक व संगीतकार होते. अरुण व अनुराधा यांना आदित्य व कविता अशी दोन मुलं आहेत. १९९१ मध्ये अरुण यांचा अपघाती मृत्यू झाला. ‘अभिमान’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदाच जया भादुरी यांच्यासाठी श्लोक गायला होता. त्यांचा आता आराजकारणातील प्रवास कसा असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Tags: Anuradha paudwalbjp entryHindi Singerpoliticssinger anuradha paudwal
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 India Women vs Pakistan Women
Women

भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

जून 15, 2026 | 11:40 am
urmila matondkar ex husband nikaah
Entertainment

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

जून 15, 2026 | 11:00 am
Kap Bashi Trailer
Entertainment

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

जून 15, 2026 | 9:57 am
krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Next Post
Rahul Vaidya Video

Video : …अन् भर कार्यक्रमातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीमध्ये बसला राहुल वैद्य, त्यांच्यासारखीच स्टाइलही मारली आणि…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.