रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फ्लॉप चित्रपटांनंतर सारा अली खानला चित्रपटसृष्टीमधूनच विचित्र वागणूक, अभिनेत्रीनेच बोलून दाखवलं, म्हणाली, “पार्टीलाही बोलवत नाही आणि…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 16, 2024 | 2:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sara ali khan on people behavior

फ्लॉप चित्रपटांनंतर सारा अली खानला चित्रपटसृष्टीमधूनच विचित्र वागणूक, अभिनेत्रीनेच बोलून दाखवलं, म्हणाली, "पार्टीलाही बोलवत नाही आणि..."

सध्या बॉलिवूडमधून अनेक विशेष धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटातून अनेक अभिनेत्रीनी आपल्या अभिनयाने या क्षेत्रात विशेष जागा निर्माण केली आहे. त्यातील एक नाव म्हणजे सारा अली खान. साराने २०१८ मध्ये दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतबरोबर ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाने साराला खूप प्रसिद्धी मिळाली तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. तिच्या भूमिकेचेही सर्वांनी खूप कौतुक केले. (Sara ali khan on people behavior)

‘केदारनाथ’च्या यशानंतर ती ‘सिंबा’, ‘लव्ह आज कल २’, ‘अतरंगी रे’, ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटांमध्येही ती दिसून आली. मात्र या चित्रपटांना म्हणावे तसे यश मिळाळे नाही. त्यामुळे तिने आता या क्षेत्रात मिळणाऱ्या वागणुकीवर भाष्य केले आहे. सध्या ती ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यावेळी तिने आपले मत व्यक्त केले.

आणखी वाचा – अभिनेत्री मधुबाला यांच्या बायोपिकची घोषणा, पण ही महत्त्वाची भूमिका नक्की कोणती अभिनेत्री साकारणार ?, ‘या’ नावांची चर्चा

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

‘बॉलिवूडलाईफ’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने आपल्या आगामी चित्रपटाबद्दल सांगितले तसेच हा चित्रपट चांगला यशस्वी होईल असेही ती म्हणाली. पण याबरोबरच या क्षेत्रातील बदललेल्या वागणुकीबद्दल बोलताना ती म्हणाली की, “मला आता अयशस्वी होण्याची भीती वाटत नाही कारण मला  सवय झाली आहे”. पुढे ती म्हणाली की, “जेव्हा २०१८साली या क्षेत्रात पाऊल ठेवले तेव्हा मला अनेकांचे प्रेम मिळाले. पण कालांतराने जसे माझे चित्रपट फ्लॉप होऊ लागले तसे त्या लोकांच्या वागण्यात बदल दिसू लागला. आधी मला लोक पार्टीमध्ये बोलवायचे पण आता नाही गेले तरीही त्यांना फरक पडत नाही. यश आणि अपयश हे जीवनाचे भाग आहेत.”

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधून किती कमावते बबिता?, मुनमुन दत्ताचं एका एपिसोडचं मानधन आहे तब्बल…

त्याचबरोबर ती हेदेखील म्हणाली की, “२०१८ मध्ये मी आकाशाला गवसणी घातली आहे असं वाटलं. मला कधीही इतके प्रेम मिळाले नव्हते. पण नंतर मला प्रेम देणाऱ्यांनीच खालीही खेचले. आधी पार्टीमध्ये किंवा इतर ठिकाणी मला येण्याचा आग्रह करत असत. पण आता असे राहिले नाही”.

त्यानंतर साराला “जान्हवी कपूर असताना असुरक्षित भावना येते का?”, असं विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली की, “ मी व साराने एकत्रच या क्षेत्रात पाऊल ठेवलं. प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं असतं. कोणीही कोणाचीही जागा घेऊ शकत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो. त्यामुळे माझ्यासारखेपण कोणीच नाही असं मला वाटतं”.

साराचा नवीन चित्रपट ‘ए वतन मेरे वतन’ हा २१ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून यामध्ये तिची महत्त्वाची भूमिका आहे.

Tags: flop moviekedarnathsala ali khan moviesara ali khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Singer Anuradha Paudwal in politics

Video : सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपामध्ये प्रवेश, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.