शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सिद्धार्थ जाधवला शोसाठी बक्षिस म्हणून मिळाली महागडी कार, बायकोसह केली पूजा, म्हणाला, “मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 18, 2024 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Jadhav received a new luxury car as a prize actor shared a special video on social media

सिद्धार्थ जाधवला बक्षीस म्हणून मिळाली नवीन आलिशान कार, अभिनेत्याने खास व्हिडीओद्वारे मानले आभार

Siddharth Jadhav Car News : मराठी सिनेसृष्टीचा एनर्जीटीक स्टार म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारा सिद्धार्थ सोशल मीडियावरही सक्रिय असतो. तो नेहमीच त्याच्या आगामी प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांबरोबर शेअर करत असतो. चाहतेही त्याच्या फोटो व व्हिडीओला भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. अशातच सिद्धार्थ पुन्हा एकदा चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. सिद्धार्थने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे तो नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. सिद्धार्थने त्याच्या नवीन गाडीनिमित्त हा व्हिडीओ शेअर केला आहे. (Siddharth Jadhav New Car)

अभिनेत्याला भेट म्हणून एक नवीन अलिशान गाडी मिळाली असून या नवीन गाडीचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिद्धार्थला स्टार प्रवाह वाहिनीकडून ही नवीन गाडी मिळाली आहे. स्टार प्रवाहच्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमानिमित्त त्याला ही कार मिळाली असून त्याने गाडीचा खास व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहे“आज न मागताच खूप काही मिळाले आहे. मराठी टेलिव्हीजनच्या  इतिहासातला मी पहिला कलाकार असेन ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. खूप भारी भावना आहेत. खूप मस्त वाटतं आहे” असं म्हणत त्याने त्याच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

आणखी वाचा – Uttarakhand Nurse Rape : “चेहरे झाकायचे का? त्यांचा जीव घ्या”, उत्तराखंडमध्ये नर्स बलात्कार प्रकरणी भडकला मराठी अभिनेता, म्हणाला, “पुन्हा एकदा…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “खूप वर्षांपूर्वी “इंडियन आयडॉल” च्या फायनल नंतर अभिजित सावंतला होंडा सिटी मिळाली होती. ते बघून खूप आनंद झाला होता. आणि आज त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या नं १ चॅनेल वर “आता होऊ दे धिंगाणा” सारखा शो होस्ट करायला मिळणं आणि त्याच शो वर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करणं आणि त्याची जी काय पोचपावती म्हणून मला ही गाडी बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नवत आहे”.  

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : अरबाजने सूरजला लाथेने उडवलं, अंगावर धावून गेला, हाणामारी केली अन्…; खेळासाठी राक्षसी वृत्ती

दरम्यान, या व्हिडीओच्या शेवटी त्याने सर्व टीमचे कौतुक केलं असून त्यांना धन्यवाद म्हटलं आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थची पत्नी नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. तसंच सिद्धार्थच्या लेकी इरा व स्वरा याही गाडी बघून आनंदी झाल्या आहेत. नवीन गाडीनिमित्त त्यांनी केकही कट केला आहे. त्याचंबरोबर त्यांनीदेखील नवीन गाडीची पूजा केली आहे. या नवीन अलिशान गाडीनिमित्त सिद्धार्थच्या अनेक चाहत्यांनी व कलाकारांनी त्याचं कौतुक केलं आहे. त्यांना नवीन गाडीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.     

Tags: marathi entertainment newssiddharth jadhavSiddharth Jadhav New Car
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
jasmin walia and hardik pandya dating

एकीकडे पूर्वाश्रमीची पत्नी देश सोडून गेली, तर दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या नव्या अफेअरची चर्चा, 'त्या' फोटोंमध्ये दिसलं सत्य

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.