Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी ५’च्या कॅप्टन्सीचा टास्क काल पार पडला आणि या कॅप्टन्सी टास्कमध्ये या घराला नवीन कॅप्टन मिळाला तो म्हणजे अरबाज पटेल. कॅप्टनीसाठी निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज, निखिल, घन:श्याम आणि योगिता या स्पर्धकांमध्ये टास्क खेळवण्यात आला. ज्या स्पर्धकाकडे खेळाच्या अंतिम फेरीत सर्वात जास्त फ्रेंच फ्राइस असतील तो सदस्य या आठवड्यात कॅप्टन होणार होता. निक्कीच्या टीममधील एकूण चार स्पर्धक कॅप्टन्सीचे दावेदार होते त्यामुळे साहजिकच त्यांनी ग्रुप करून हा टास्क खेळला आणि अंतिम फेरीपर्यंत निखिल, योगिता, सूरज असे सगळे प्रतिस्पर्धी खेळाडू बाद होऊन अरबाज या आठवड्यात घराचा कॅप्टन झाला. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)
या कॅप्टन्सी टास्कसाठी सदस्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पहिल्या फेरीत योगिता व घन:श्याम बाद होतात, कारण त्यांच्याकडे एकही फ्राइज शिल्लक राहत नाही. यानंतर निखिल, सूरज, अरबाज, निक्की व जान्हवी अशा क्रमवारीने फ्राइज दिले जातात. दुसऱ्या फेरीत अरबाज अॅक्शन मोडमध्ये जातो आणि सूरज-निखिलकडून फ्राइज खेचून घेतो. अरबाज सर्व फ्राइज निक्की व जान्हवीला आणून देतो. तर सूरज त्यांच्याकडून ते खेचून घेण्याचा प्रयत्न करतो. यावेळी जान्हवी व निक्की सूरजला घाबरत होत्या. निक्की त्याच्या भीतीने सतत अरबाजला हाका मारत होती.
यावेळी प्रेक्षकांना टास्क तर पाहायला मिळाला. पण हाअ टास्क जिंकण्यासाठी अरबाजची राक्षसी वृत्तीही पाहायला मिळाली. अरबाजने आपल्या शक्तीचा व बळाचा वापर सूरजवर अयोग्य रित्या केल्याचे पाहायला मिळाले. अरबाजने निक्की व जान्हवी यांना दिलेले फ्रेंच फ्राइज सूरज घ्यायला गेला असताना अरबाजने अनेकदा त्याला लाथ मारली. अनेकदा त्याचा शर्टही पकडला. तसंच अरबाजने फ्रेंच फ्राइजने घ्यायची वेळे आली तेव्हा सूरजला अक्षरश: जमिनीवर लोळावले. मात्र सूरजने अरबाजचा पूर्णत: लढा दिला. अरबाज सूरजवर ओरडतो की सूरजने त्याला बुक्की मारली. सूरज त्याच्यासोबत भिडतो, तेव्हा सूरजवरुन उर्वरीत सदस्यांमध्ये बाचाबाची होते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील इतर सदस्यांना हरवून अरबाज पटेल झाला नवीन कॅप्टन, मात्र कौतुक सूरज चव्हाणचं
दरम्यान, कॅप्टन पदासाठी सूरजने अरबाजबरोबर चांगला लढा दिला. मात्र सूरजचा अरबाजबरोबरचा हा लढा तितकासा चालला नाही. त्यामुळे कॅप्टन्सीचे पद अरबाजकडे आले. दुसऱ्या फेरीत सूरज आणि निखिल बाद होतात. तिसऱ्या फेरीत जान्हवी आणि निक्की बाद झाल्याने अरबाज पटेल ‘बिग बॉस मराठी ५’चा नवा कॅप्टन होतो. अरबाजला कॅप्टन्सी मिळाल्यामुळे निक्की व जान्हवी यांनी चांगलाच आनंद व्यक्त करतात. अरबाज कॅप्टन झाला असला तरी या पदाचा योग्य दावेदार सूरज असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.