Uttarakhand Nurrse Rape : कोलकात्याच्या आरजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार, सामूहिक बलात्कार आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हजारो लोक रस्त्यावर उतरून न्यायाची याचना करत आहेत, तर देशभरातील जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेनंतर महिला अत्याचार व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरला आहे. त्यामुळे मराठीसह बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी या घटनेवर संताप वक्त केला आहे. आपला राग, आपला आक्रोश, आपली चीड हे कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे व्यक्त करताना दिसत आहेत. कोलकाता येथील बलात्कार प्रकरणानंतर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आपलं परखड मत मांडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. (Siddharth Chandekar angry on Uttarakhand Nurrse Rape)
अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “सॉरी भारत ‘माते’! तुला तुझ्याच घरात स्वातंत्र्य नाही! हा स्वातंत्र्य दिन तुझ्यासाठी आनंदी नाही. क्षमा.” या व्हिडीओत सगळ्यांना विचार करायला भाग पडणारा मुद्दा सिद्धार्थने मांडला. अशातच त्याने उत्तराखंडमधील उधम सिंग नगरमध्ये एका नर्सबद्दलही त्याची भूमिका व्यक्त केली आहे. कोलकाता येथे ज्युनियर डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि नंतर निर्घृण हत्येतून देश सावरत नाही तोपर्यंत उत्तराखंडमधील उधम सिंग नगरमध्ये एका नर्सवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेवर सिद्धार्थने रोखठोक भूमिका मांडली आहे.
या प्रकरणी सिद्धार्थने सोशल मीडियावर त्याचा राग व्यक्त करत “जीव घ्या यांचा” असं म्हटलं आहे. सिद्धार्थने उत्तराखंडमधील महिलेवरील अत्याचारचे वृत्त शेअर करत असं म्हटलं आहे की, “आणि पुन्हा एकदा… काय चाललं आहे?आपण कोण आणि काय बनत चाललो आहोत? का झाकायचे चेहरे यांचे दाखवा जगाला आणि जीव घ्या त्यांचा”. कोलकाता बलात्कार प्रकरणानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकजण हळहळत आहे.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरातील इतर सदस्यांना हरवून अरबाज पटेल झाला नवीन कॅप्टन, मात्र कौतुक सूरज चव्हाणचं
सिद्धार्थ चांदेकर, हेमांगी कवी, सई ताम्हणकर, समीर विद्वांस, जिनिलीया देशमुख, नेहा शितोळे, अनघा अतुल, अमित रेखी, हेमंत ढोमे, मंजिरी ओक, रोहित परशुराम यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसंच प्रीती झिंटा, समंथा रुथ प्रभू, क्रिती सेनॉन, आलिया भट्ट, हृतिक रोशन, ट्विंकल खन्ना यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.