सध्याच्या परिस्थतीत कलाकार जेवढा रुपरी पडद्यावर जेवढा गाजतो कधी कधी लहान गोष्टींवरून ट्रॉल ही केला जातो. कधी या ट्रॉलिंगची भाषा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक. असच काहीस घडलंय मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोबत.(Sankarshan Karhade Troll)
रुपेरी पडदा असो व रंगमंच संकर्षणच्या अभिनयाचं पारडं नेहमी जड असतं. अभिनयासोबतच एखाद्या विषयावर तेवढच परखड मत असणं ते जगासमोर मांडणं हे ही कसब संकर्षणला चांगलंच अवगत आहे. संकर्षण परभणीहून मुंबईत आला आणि त्याच्या संघर्षाला सुरुवात झाली अनेक नाटकं, एकांकिका, चित्रपट, मालिका या घटकांमध्ये अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
पहा संकर्षण का झाला ट्रोल (Sankarshan Karhade Troll)
सध्या रंगभूमीवर गाजणाऱ्या नावानं मध्ये संकर्षण कऱ्हाडे, प्रशांत दामले नी नाव चांगलीच चर्चेत आहेत. वेगवेगळ्या विषयांची नाटकं निर्मित करून प्रेक्षकांना पुन्हा नाटयगृहांकडे आकर्षित करण्याचं काम संकर्षण आणि प्रशांत दामले या जोडीने केलं आहे. आज जागतिक रंगभूमीदिनानिम्मित संकर्षण ने त्याच्या सुरु असलेल्या नवीन नाटकाच्या शुभारंभावेळी पूजा करतानाचा एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून शेअर केला आहे.
पोस्टच्या कॅप्शन मध्ये संकर्षणने लिहिलं आहे ‘ “जागतीक रंगभूमी दिन” तुम्हा सगळ्यांना अनंत शुभेच्छा.. खरंच रंगभूमी वर वावरण्यासारखं सुख नाही.. अनंत जन्माची पुण्यायी म्हणुन हे भाग्यं मिळतं..“नियम व अटी लागू..” च्या शुभारंभाचा हा व्हिडियो आहे.. पहिलं , अगदी पहिलं नारळ वाढवण्याचा मान मला निर्माते आणि दिग्दर्शक ह्यांनी दिला.. माझं भाग्यं कि , “प्रशांत दामले” हा माणुस बापासारखा शेजारी उभा राहून मला साथ देतो .. टाळी वाजवून बळ देतो.. माझं भाग्यं .. चं. कु. सरांसारखे दिग्दर्शक मला मिळतात..’
हे देखील वाचा – पंचेचाळीस मिनिटात १०८ सूर्यनमस्कार,कोल्हेंचं स्वतःला चॅलेंज

संकर्षणाच्या या पोस्ट वर चाहत्यांनी छान कमेंट केल्या पण सोबतच एक सल्ला ही दिला चाहत्यांनी ‘खूप छान तुम्हाला ही शुभेच्छा पण बूट काढून जर नारळ वाढवला असता तर अजून छान वाटलं असत’ अशा कमेंट केल्या आहेत. प्रेक्षकांच्या या प्रश्नांवर उत्तरं देत संकर्षण ने लिहिलं आहे ‘मला कल्पना होती हि comment येइल.. पण ते नाटकातले बूट आहेत… फक्तं आणि फक्तं स्टेजवर वापरले जातात.. नाटकाचा भाग आहेत..’.
येणाऱ्या प्रतिक्रियेची संकर्षणला पूर्व कल्पना होतीच असं म्हणत त्याने त्याची बाजू मांडली आहे.(Sankarshan Karhade Troll)
