शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

…अन् ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम श्याम राजपूतला प्राजक्ता माळीने शिकवलं मेडिटेशन, म्हणाले, “या दोन महिन्यांमध्ये मी…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑगस्ट 12, 2023 | 2:09 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Shyam Rajput during Vacation

...अन् 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम श्याम राजपूतला प्राजक्ता माळीने शिकवलं मेडिटेशन, म्हणाले, "या दोन महिन्यांमध्ये मी..."

गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा लाडका कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’. दमदार विनोदी स्किट्स आणि कलाकारांची आगळीवेगळी शैली ही या कार्यक्रमाची मुख्य ओळख बनली आहे. शिवाय कलाकारांची पडद्यामागील मेहनत आणि तंत्रज्ञ, लेखक-दिग्दर्शक व संपूर्ण टीमकडून मिळणाऱ्या उत्तम सहकार्यामुळे हा कार्यक्रम देश-विदेशातील प्रेक्षकांचा अगदी जवळचा बनला आहे. (Shyam Rajput during Vacations)

प्रेक्षकांच्या या लोकप्रिय कार्यक्रमाने जेव्हा छोट्या पडद्यावर काही काळासाठी ब्रेक घेतला होता. तेव्हा त्यातील बऱ्याचश्या कलाकारांनी अमेरिकेचे दौरे केले होते. कार्यक्रमाच्या अमेरिकेतील सर्वच प्रयोगांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे.

प्रेक्षकांना हसवण्यासाठी हास्यजत्रेतील सर्व विनोदवीर पुन्हा सज्ज झाले असून यानिमित्त कार्यक्रमातील कलाकार खान्देश सपुत श्याम राजपूत यांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’ला मुलाखत दिली. ज्यात त्यांनी दोन महिन्यांच्या काळात घेतलेल्या सुट्टीचा अनुभव शेअर केला आहे.

पाहा श्याम राजपूत काय म्हणाला (Shyam Rajput during Vacations)

हे देखील वाचा – अमेरिकेत कसिनोमध्ये ७०० डॉलर जिंकला गौरव मोरे, स्वतःच सांगितला ‘तो’ धमाल किस्सा

View this post on Instagram

A post shared by Shyam Rajput (@shyam.rajput.779)

अभिनेते श्याम राजपूत काही वैयक्तिक कारणांमुळे हास्यजत्रेतील अन्य कलाकारांसह अमेरिकेला गेले नव्हते. मात्र त्यांनी या काळाचा सदुपयोग करत अनेक गोष्टी शिकल्या होत्या. ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेते श्याम राजपूत म्हणाले, “दोन महिन्यात मी बरंच काही केलं आहे. मला फोर व्हीलर चालवता येत नव्हती, ती चालवायला शिकलो. स्विमिंग शिकत होतो, थोडीफार मराठी पुस्तके वाचली. त्याच्यानंतर माझा व्यायामही सुरु होता. मी वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते काही झालं नाही. त्याचबरोबर प्राजक्ता माळीने जे मेडिटेशन शिकवलं, त्याची प्रॅक्टिस मी करत होतो. अभिनयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मेडिटेशन खूप गरजेचं आहे. हे सगळं करत असताना त्या काळात मी अनेक कार्यक्रमांना गेलो होतो. शिवाय चित्रीकरणदेखील सुरु होते”.

हे देखील वाचा – पृथ्वीक प्रतापचं मोठं मन, अमेरिकेत शो करत असताना दत्तू मोरेसाठी केली मोठी गोष्ट, प्रियदर्शिनी म्हणते, “पहिल्या दोन शोनंतर…”

अभिनेते श्याम राजपूत याआधी अनेक मालिका व कॉमेडी शोजमध्ये दिसले असले, तरी त्यांना खरी ओळख ही हास्यजत्रेतून मिळाली आहे. येत्या १४ ऑगस्ट पासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ छोटा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला असून चाहते याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे.

Tags: its majja exclusivemaharashtrachi hasyajatrashyam rajput
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
nana patekar sunny deol

'गदर २' च्या प्रीमिअरला नाना पाटेकरांची हवा, व्हिडिओ होतोय व्हायरल..

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.