अनेक कलाकार आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा बॉलिवूड एकापेक्षा एक कलाकार मनोरंजन सृष्टीत अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. सध्या या नावांपैकी एक नाव चांगलंच चर्चेत आहे ते म्हणजे बॉलिवूड अभिनेता सनी देओल. सनी देओलचा अत्यंत गाजलेला चित्रपट म्हणजे ‘ गदर ‘.चित्रपटातील प्रेम कहाणी, गाणी, अभिनय या सर्वांमुळे गदरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सनीच्या चाहत्यांसाठी सध्या आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे गदरचा पुढचा भाग ‘गदर २’ नुकताच प्रदर्शित झाला आहे आणि प्रेक्षकांचं चांगलाच पसंतीस देखील उतरत आहे.(nana patekar sunny deol)
सर्वत्र सनीच्या ‘गदर २’ची चर्चा असताना आता गदरच कौतुक करण्यासाठी पोहचलेल्या मराठमोळ्या नाना पाटेकर यांची मात्र हवा सर्वत्र पाहायला मिळते. नुकताच ‘गदर २’ च्या प्रीमिअरला नाना पाटेकर यांनी हजेरी लावली. या वेळी नाना पाटेकर यांनी अभिनेता सनी देओलची गळाभेट घेत त्याची पाठ देखील थोपटली. तसेच सनी सोबत आपल्या बाहू उंचावून शक्ती प्रदर्शन करताना देखील नाना पाटेकर दिसले.(sunny deol gadar 2)
हे देखील वाचा- Gadar 2 Box Office Collection : ‘गदर २’ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई, पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
नाना पाटेकर यांनी मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. तसेच नाना पाटेकर त्यांच्या साध्या राहणीमानामुळे नेहमी चर्चेत असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘नटसम्राट’, ‘देऊळ’, ‘पकपक पकाक’, ‘आपला माणूस’, ‘गोष्ट छोट्या डोंगराएवढी’, अशा अनेक चित्रपटातून नानांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.(nana patekar movies)
हे देखील वाचा- Gadar 2 First Review : कसा आहे सनी देओलचा ‘गदर २’ चित्रपट, पहिला शो बघितल्यानंतर प्रेक्षक म्हणाले…
मराठी चित्रपटांप्रमाणेच नाना पाटेकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘तिरंगा’, ‘क्रांतीवीर’, वेलकम’, परिंदा’ अशा अनेक चित्रपटांमधून देखील नाना प्रेक्षकांच्या भेटीला आले.(nana patekar sunny deol)