Prasad Khandekar Post : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर साऱ्या महाराष्ट्राला खळखळवून हसवलं. हा शो गेली अनेक वर्ष सुरु असून प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकारांनी त्यांच्या हास्यविनोदाने वेड केलं. सध्या हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर प्रदर्शित होत नसला तरी या कार्यक्रमाचे जगभरात अगदी दणक्यात शो सुरु आहेत. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम परदेश दौरे करण्यात व्यस्त असल्याचं दिसतंय. परदेश दौऱ्यातील अनेक फोटो, व्हिडीओ ही कलाकार मंडळी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट करत आहेत.
यापैकीच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कायम चर्चेत असणारा कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसाद खांडेकरने आजवर आपल्या विनोदी अभिनयाने, विनोदाच्या उत्तम टायमिंगने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनयाबरोबरच प्रसाद उत्तम दिग्दर्शक म्हणूनही काम करताना पाहायला मिळत आहे. अभिनयासंबंधी तो नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. इतकंच नव्हे तर तो कुटुंबाबरोबरच्या पोस्टही नेहमीच शेअर करताना दिसतो.
आणखी वाचा – लग्नाला १० महिने पूर्ण होताच मुग्धा वैशंपायनने शेअर केला रोमँटिक फोटो, पाहा Unseen Moment
अशातच तब्बल एक महिन्यानंतर प्रसाद परदेशवारी करुन घरी परतला आहे. यापूर्वीही हास्यजत्रेतील कलाकार मंडळींनी अमेरिकेत भरपूर शॉपिंग केली असल्याचे फोटो शेअर केले होते. यानंतर आता भारतात परतल्यानंतर प्रसादने शेअर केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. “महिनाभर घरातल्या सगळ्यांना प्रचंड मिस केल्यानंतरचं गेट टू गेदर (भाचे मंडळी गिफ्टचा हफ्ता घ्यायला आलेले ती वेगळी गोष्ट)”, असं कॅप्शन देत प्रसादने संपूर्ण कुटुंबाबरोबरचा सेल्फी शेअर केला आहे.
हा फोटो पाहून अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. इतकंच नव्हे तर अनेकांनी कमेंट करत संपूर्ण कुटुंबाचं कौतुक केलं आहे. कामाच्या व्यस्त शेड्युलमधून वेळात वेळ काढून प्रसाद त्याच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना वेळोवेळी पाहायला दिसला आहे. अशातच प्रसादने इन्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.