२०२१ मध्ये झी मराठीवर ऑन एअर झालेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. मालिकेतील यश व नेहाच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर तर केली, शिवाय परीच्या क्यूटनेसचीही प्रेक्षकांना भूरळ पडली. याच मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदेने छोट्या पडद्यावर रीएन्ट्री केली होती. त्याचबरोबर अभिनेत्री प्रार्थना बेहरे व मायरा व्याकुळ यांच्या अभिनयाने नटलेल्या ह्या मालिकेने कमी काळातच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिका संपून बराच काळ झाला, पण चाहते या मालिकेला अजूनही मिस करतायत.(Mazi Tuzi Reshimgath Season 2)
सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह राहणाऱ्या श्रेयसने आता या मालिकेचा दुसरा सिझन येण्याची हिंट दिली. तसा व्हिडिओ श्रेयसने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. व्हिडिओत श्रेयससोबत मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर दिसतायत. “वो घड़ी जिसका आप सभी को इंतजार था…. आमची ही रेशीमगाठ कधीही तूटायची नाही !” असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलंय.
व्हिडिओत श्रेयस म्हणतो, “आम्हाला दोघांनाही असं मनापासून वाटतं होतं, की आपण भेटावं. पण वेळ मिळत नव्हती, त्यामुळे शक्य होत नव्हतं. पण मनात दोघांच्या इतकं प्रेम होतं. आणि स्पेशली माझी तुझी रेशीमगाठचे जितके फॅन्स आहेत, त्या सगळ्यांना आज हे बघून प्रचंड आनंद होईल, की आम्हाला दोघांना भेटायचं होतं. अन आज काहीही प्लॅन न करता दोघांचेही शूटींग एकाच ठिकाणी होतं आणि आम्ही एकमेकांच्या समोरासमोर आलो. पाऊस पडत होता आणि त्या पावसात आमची रेशीमगाठ पुन्हा एकदा जोडून आली” असं म्हणत तो दिग्दर्शक अजय मयेकरची भेट घडवतो.(Mazi Tuzi Reshimgath Season 2)
पुढच्या सिझन बद्दल दिगदर्शक म्हणतात…(Mazi Tuzi Reshimgath Season 2)
त्यावर दिग्दर्शक अजय मयेकर म्हणतात, “सर मला जाऊ द्या, माझं शूटींग सुरु आहे”. त्यावर श्रेयस “जोपर्यंत तू ‘माझी तुझी रेशीमगाठ’चा दुसरा सीझन कधी येणार हे सांगत नाही तोपर्यंत मी तुला जाऊ देणार नाही”, असं त्यांना सांगतो. यावर अजय मयेकर सांगतात की, “सर तुमच्या डेट्स नाहीत, मॅडमच्या पण नाहीत”. तरीही श्रेयस दिग्दर्शकाची मनधरणी करतो.
श्रेयसच्या या व्हिडिओवर मालिकेच्या कलाकारांनी मजेशीर कमेंट्स केल्यात. अभिनेत्री प्रार्थना बेहरे, स्वाती देवल व अभिनेता आनंद काळे यांनी आमच्या डेट्स फ्री असून कधीपासून तयारीला लागायचं, अश्या मजेशीर कमेंट्स केल्या असून चाहतेही मालिकेच्या नव्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहे.