छोट्या पडद्यावरील ‘बिगबॉस मराठी’ रिऍलिटी शोमधून आजवर अनेक कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले, त्यातलाच एक चेहरा म्हणजे वीणा जगताप. वीणा ‘बिगबॉस’च्या दुसऱ्या सीझन सोबत राधा प्रेम रंगी रंगली, आई माझी काळूबाई या मालिकेतही दिसली होती. सध्या वीणा छोट्या पडद्यावर फारशी दिसत नसली, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात राहते. वीणाच्या इंस्टाग्रामवरील फोटोज, व्हिडिओसला चाहत्यांच्या कॉमेंट्सचा पाऊस पडतो.(Veena Jagtap Good News)
आता याच अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांसमोर एक गुड न्यूज शेअर केली. वीणाच्या भावाने एक नवी कोरी कार घेतली असून त्या कारची झलक इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत आपल्या चाहत्यांना दाखवली. या फोटोजमध्ये वीणाचा भाऊ, वहिनी व कुटुंबातील अन्य सदस्य दिसतायत. हे फोटोज शेअर करताना वीणा म्हणते, “First Follow Your Dream, Later Drive Your Dream???? Congratulations Bhau & Vahini For the New Vehicle????????” तिची ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी वीणाचे अभिनंदन केले.
अभिनेत्री वीणा जगताप बिगबॉसच्या घरात असताना अनेक कारणांनी चर्चेत राहिली. घरात तिची व शिव ठाकरेची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. काही महिन्यांपूर्वी वीणा हार्दिक जोशी व अक्षय देवधरच्या लग्नात दिसले असून चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहतायत.(Veena Jagtap Good News)