सोमवार, मे 19, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अ‍ॅक्शन, ड्रामा थ्रिल अन् बरंच काही, या वीकेंडला ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी, पाहता येणार ‘या’ लोकप्रिय सीरिज

Saurabh Moreby Saurabh More
मे 10, 2024 | 1:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Adujeevitham The Goat Life, Andekhi 3, Murder in Mahim will be released today see the details

अ‍ॅक्शन, ड्रामा थ्रिल अन् बरंच काही, या वीकेंडला ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी, पाहता येणार ‘या’ लोकप्रिय सीरिज

ओटीटीवर दर आठवड्याला नवीन काहीतरी प्रदर्शित होतंच असते. ओटीटीवर अ‍ॅक्शन, ड्रामा, रोमान्स अशा सगळ्या आशयाचे नवीन चित्रपट किंवा वेबसिरीज प्रदर्शित होत असतात. अशातच येत्या वीकेंडला ओटीटी वापरकर्त्यांसाठी चित्रपट व वेबसिरीजची पर्वणी असणार आहे. हे नवीन चित्रपट आणि वेबसिरीज कोणत्या आहेत, जाणून घ्या…

आदुजीविथम – द गोट लाइफ : ‘आदुजीविथम – द गोट लाइफ’ हा मल्याळम सर्व्हायव्हल ड्रामा आहे. या चित्रपटात पृथ्वीराज सुकुमारन, जिमी जीन-लुईस आणि केआर गोकुळ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ब्लेसी यांनी केले असून यात पृथ्वीराज सकुमारनव अमाला पॉल यांच्या भूमिका आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी माध्यमावर आज म्हणजेच १० मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

अनदेखी ३ : नंदिश संधू, हर्ष छाया यांची ‘अनदेखी ३’ ही सोनी लिव्हवरील सर्वात लोकप्रिय सीरिज आहे. या सीरिजचे याआधी दोन सीझन प्रदर्शित झाले असून या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला. हे दोन्ही सीझन्स खूप हिट झाले. आशातक आता निर्मात्यांनी तिसरा सीझनही प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘अनदेखी’ सीरिजचा हा तिसरा भाग आज म्हणजेच १० मे रोजी प्रदर्शित होत आहे. तुम्ही आधीचे दोन्ही सीझन पहिले असतील तर आता हा तिसरा भागही तुमचे चांगलेच मनोरंजन करेल हे नक्की. ही मालिका हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड, मराठी आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत दिव्येंदू भट्टाचार्य, सूर्या शर्मा, हर्ष छाया, आंचल सिंग, अंकुर राठी आणि अभिषेक चौहान यांच्या भूमिका आहेत.

मर्डर इन माहीम : माहीम स्टेशनवर झालेल्या एका भीषण हत्येच्या पार्श्वभूमीवर हा शो पीटरच्या मागे येतो कारण तो या गुन्ह्याच्या तपासात अडकतो. जेव्हा त्यांचा मुलगा सुनील या प्रकरणात संशयित बनतो तेव्हा प्रकरण अधिक तीव्र होते. या दरम्यान, पीटर आणि जेंडे स्वतःला छुप्या आकांक्षा, पिळवणूक आणि बिनधास्त प्रेमाच्या क्षेत्रात बुडलेले दिसतात कारण ते मायावी किलरचा पाठलाग करतात अशी मर्डर इन् माहीमची कथा आहे.यामध्ये आशुतोष राणा व विजय राज फिजियोलॉजिकल क्राइम थ्रिलर सीरिज ‘मर्डर इन माहिम’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या मर्डर मिस्ट्री सीरिजमध्ये शिवानी रघुवंशी व शिवाजी साटमदेखील दिसतील. ही सीरिज १० मे रोजी जिओ सिनेमा या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होईल.

8 एएम मेट्रो : ही एक लव्हस्टोरी असून यात गुलशन देवैया व सैयामी खेर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १० मे रोजी झी ५ वर रिलीज होईल. 8 एएम मेट्रोची कथा दोन व्यक्तींभोवती फिरते सकाळी आठ वाजता ते मेट्रोमध्ये कसे भेटतात आणि हळूहळू त्यांचे नाते कसे पुढे जाते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

Tags: Adujeevitham The Got LifeMurder in Maheemott newsUndekhi 3
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sharmila Shinde Shares Experience
Entertainment

“सीनमध्ये बाळ गेलं पण…”, ‘नवरी मिळे…’मधल्या दुर्गाला खऱ्या आयुष्यात झाला शारिरीक त्रास, म्हणाली, “रडले, रागावले…”

मे 19, 2025 | 7:00 pm
achint kaur struggle for work
Entertainment

१८व्या वर्षातच लग्न, घटस्फोट, बॉयफ्रेंडचीही पाठ; आता कामासाठी वणवण फिरतेय सुप्रसिद्ध अभिनेत्री, ओळखणंही कठीण

मे 19, 2025 | 6:38 pm
worms and fungus in dairymilk Cadbury
Entertainment

कॅडबरीमध्ये अळ्या, बुरशी अन्…; साताऱ्याच्या डी-मार्टमधील धक्कादायक प्रकार, मराठी अभिनेत्रींनी शूट केला व्हिडीओ

मे 19, 2025 | 5:45 pm
Shilpa shirodkar corona positive
Entertainment

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला करोना, मुंबईत पुन्हा वाढले रुग्ण, आता परिस्थिती अशी की…

मे 19, 2025 | 4:55 pm
Next Post
Amol Kolhe decided to take a break from acting in the serial

अमोल कोल्हे यांचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक, यामागचं नेमकं कारण काय?, स्वतःच केला खुलासा, म्हणाले, "मालिका विश्वात..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.