मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमोल कोल्हे यांचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक, यामागचं नेमकं कारण काय?, स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “मालिका विश्वात…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 10, 2024 | 2:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amol Kolhe decided to take a break from acting in the serial

अमोल कोल्हे यांचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक, यामागचं नेमकं कारण काय?, स्वतःच केला खुलासा, म्हणाले, "मालिका विश्वात..."

मराठी मनोरंजनसृष्टीतील काही कलाकार मंडळी ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेतच, पण याव्यतिरिक्त ते राजकरणातही तितकेच सक्रिय आहेत. अशा काही कलाकारांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच राजकारणाच्या माध्यमातूनही त्यांनी अनेक लोकोपयोगी कामेदेखील केले आहेत. अशातच सध्या देशभरात निवडणूकांचं वारं वाहत आहे.

अमोल कोल्हे हे अभिनेते असण्याबरोबरचं शिरूर मतदारसंघाचे खासदारही आहेत. त्यामुळे सध्या निवडणुकीच्या प्रचात व्यस्त असताना त्यानी मनोरंजन क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमोल कोल्हे हे दुसऱ्यांदा शिरूर मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहिले असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ब्रेक घेत असल्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल अमोल कोल्हे यांनी नुकताच ‘साम मराठी’शी संवाद साधला.  

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

आणखी वाचा – रुपालीने डाव साधला, राजाध्यक्ष कुटुंबीयच घेणार एकमेकांचा बळी, ‘सातव्या मुलीची…’ मालिकेत नवं वळण

या संवादादरम्यान अमोल कोल्हे यांनी असं म्हटलं आहे की, “शिरूर मतदारसंघातले अनेक निर्णय आपण गेल्या पाच वर्षात मार्गी लावत आणले आहेत. पुणे-नाशिक महामार्ग किंवा पुणे-अहमदनगर महामार्ग असेल हे प्रकल्प येत्या काळात मार्गी लावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर इंद्राणी मेडीसीटीसारखा आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवणारा प्रकल्प येत्या काळात होणार आहे. यामध्ये मेडिकल कॉलेज, पॅरामेडिकल कॉलेज असणार आहे. शिरूरमधील आदीवासी मुलांसाठी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र उभारण्याचे प्रकल्प मार्गी आहेत.

आणखी वाचा – अ‍ॅक्शन, ड्रामा थ्रिल अन् बरंच काही, या वीकेंडला ओटीटी प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी, पाहता येणार ‘या’ लोकप्रिय सीरिज

यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “स्वत: लोकसभेचा उमेदवार असताना आठ लोकसभा मतदार संघामध्ये प्रचारासाठी मला जाताना पहिलं. त्यामुळे या सगळ्यासाठी लागणारा वेळ देणं गरजेचं आहे आणि मालिका विश्वात काम करताना हा वेळ देणं शक्य नाहीये. त्यामुळे येत्या पाच वर्षांसाठी हा ब्रेक घेणं गरजेचं आहे. अनेक चाहत्यांची यांमध्ये निराशा होऊ शकते. मात्र शिरूरच्या जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या दृष्टीने मी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाच वर्षांसाठी का होईना मालिका विश्वातील अभिनयातून मला ब्रेक घ्यावा लागत आहे”.     

Tags: amol kolhemarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada

अधिपतींच्या आयुष्यातील सरगमची ढवळाढवळ अक्षराला सहन होईना, समजही दिली अन्…; प्रोमो पाहून उत्सुकता शिगेला

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.