चला हवा येऊ द्या हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय शो आहे. या शो मधील सर्वच कलाकारांनाही प्रसिद्धी मिळाली. मराठमोळी अभिनेत्री श्रेया बुगडे ही चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून घराघरात पोहचली. सध्या तीच्याकडे सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणूनच पाहिलं जातं. श्रेया ऑनस्किन प्रमाणेच सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्गही आहे.नुकतंच तिने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली.(shreya bugade)
श्रेया नेहमी सोशल मीडियावर तिच्या फोटो,व्हिडीओ सोबतच तिच्या आयुष्यातील काही अपडेट चाहत्यांसोबत शेअर करते.नुकतीच तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीसाठी पोस्ट केली आहे. ती त्या व्यक्तीला मिस देखील करत आहे, तर ही जवळची व्यक्ती तिचा नवरा निखिल आहे. श्रेया सोशल मीडियावर नेहमी तिच्या पतीसोबतचे फोटो व्हिडीओ शेअर करते. तर आता देखील तिने तिच्या पतीसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहरेत. तिने शेअर केलेला फोटो हा एका बोटीतील असून दोघेही निसार्गाचा आनंद घेत आहे. हा फोटो शेअर करत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जगा आणि मरा अश्या कुल अंदाजात राहणाऱ्या माझ्या जवळच्या मित्राला, हा माझा डासिंग पार्टनर,ड्रिंकिंग बडी,असं खूप काही आहे, असं म्हणत तिने काही शब्दात त्याच्यावर असलेलं प्रेम व्यक्त केलं.तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसोबत कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.(shreya bugade)
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Image-2023-04-01-at-6.46.33-PM-1024x1002.jpeg)
हे देखील वाचा: श्रीदेवी सारखी दिसते प्राजक्ता लुकची होतीये सगळीकडे चर्चा
यासोबतच ती पुढे म्हणाली आहे, तुझ्यापासून दूर राहण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे.पण हे कामामुळे,
लवकरच भेटू,मला तुझी आठवण येते,माफ कर पण आपण परत भेटलो की नक्की पार्टी करू.तोपर्यंत केकचा आनंद घ्या .लव्ह यू असं म्हणत ती त्याला मिस करते असं सांगितलं आहे. यावरून ती नवऱ्याच्या वाढदिवशी घरापासून लांबआहे समजत.श्रेया ही सध्या तिच्या कामानिमित्त कुठेतरी बाहेर आहे हे देखील या पोस्टवरून समजत. तर ती कोणत्या ठिकाणी शूटिंगला गेली का? ती कोणता नवीन प्रोजेक्त घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येते? हे जाणून घेण्यासाठगी सध्या चाहते उत्सुक आहे. तर तुम्ही श्रेयाला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी किती उत्सुक आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Image-2023-04-01-at-6.46.09-PM-1024x546.jpeg)