श्रीदेवी सारखी दिसते प्राजक्ता लुकची होतीये सगळीकडे चर्चा

Prajakta Mali Sridevi
Prajakta Mali Sridevi

मालिका म्हणजे फक्त कौटुंबिक घटनांवर भाष्य करणारीच असते असं नाही तर कधी कधी समाजातील महत्वाच्या घटकांवर सुद्धा आधारित असतात. मालिकांच्या विश्वात अशीच एक ४० भागांची एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली ती म्हणजे ‘पोस्ट ऑफिस उघड आहे’ या मालिकेत संभाषणाच महत्वाचं साधन म्हणजे पत्र. संभाषणाचं पारंपरिक साधन म्हणजे पत्र असं म्हणायला हरकत नाही. परंतु आधुनिक काळात ९० च्या शतकातील पत्रांची कमी झालेली महती या मालिकेत मांडण्यात आली आहे.(Prajakta Mali Sridevi)

सोनी मराठी वाहिनी वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतील काही कलाकारांच्या साहय्याने सोनी मराठी कडून या मालिकेची रचना करण्यात आली पत्रांची सुरुवात, पोस्ट ऑफिस मधलं कामकाज, आणि त्यानंतर विकसित तंत्रज्ञानाच्या ओघाने घेतलेला लिखित पत्रांचा ताबा यावर या मालिकेची कथा फिरवण्यात आली आहे सोबतचा ९० चा काळ सुद्धा यातून दाखवण्यात आला आहे. या मालिकेच्या निम्मिताने ९० च्या दशकातली सिने तारे तारकांच्या काही आठवणी प्रेक्षकांच्या मनात जाग्या झाल्या आहेत.

हे देखील वाचा- शिवकन्या देतेय गडकिल्ले संवर्धनाची हाक

नव्वदीच्या काळातली प्रत्येक गोष्ट आठवणींच्या कोपऱ्यात साठवून ठेवावी अशी… अगदी शाळेत वापरलेल्या पेन्सिलीपासून ते सिनेमांमधून प्रेरित होणाऱ्या फॅशनपर्यंत… ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेतून नव्वदीच्या दशकातील जादुई काळाची मोहिनी पुन्हा अनुभवता यावी आणि नवीन पिढीला त्या काळाची ओळख पटावी म्हणून हा प्रयत्न… ही मालिका पाहून तो काळ जगलेल्या प्रत्येकाला ‘आले ते दिन आले’ असं म्हणावसं वाटेल ही आशा! त्या काळातील हे कथानक असल्याने पात्रांचा लूकही तसाच दाखविण्यात आला आहे. अशातच प्राजक्ता माळी या मालिकेत पाहायला मिळतेय. प्राजक्ताचा श्रीदेवी वाला लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(Prajakta Mali Sridevi)

या लूकने साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. श्रीदेवीने बॉलिवूडमधील नव्व्दचा काळ चांगलाच गाजवला. तर ही मालिकाही नव्व्दच्या दशकातील दाखवण्यात आली असून या मालिकेत प्राजक्ताला श्रीदेवीच्या लूक मध्ये पाहणं रंजक ठरतंय. नव्वदचा काळ गाजवणाऱ्या या सिने तारकांच्या आठवणी पोस्ट ऑफिस उघड आहे मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Bhagya Dile Tu Mala Today Episode
Read More

राज कावेरी आणि वैदेहीच Reunion!सानियाला होणार अटक?

पोलीस सानिया पर्यंत पोहचणार का? सानिया विरोधात विधीने साक्ष दिल्यावर माहेरचा चहा रत्नमाला मोहिते आणि राज कावेरीला त्यांची पूर्ण प्रॉपर्टी परत मिळणार का?
Aai Kuthe Kay Karte Serial Today Episode
Read More

अरुंधती परतणार! आशुतोषला भावना अनावर अरुंधतीला मारली घट्ट मिठी

अरुंधतीच्या येण्यानं गोखले कुटुंब आनंदी तर देशमुख कुटुंब मध्ये संजना अनिरुद्धचा वाद सुरूच अरुंधती रागात म्हणाली मी कोणासाठी उपवास धरू या अनिरुद्ध साठी तर ते...... (Aai Kuthe Kay Karte Serial Today Episode)