महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून रितेश आणि जेनेलिया कायमच चर्चेत असतात. मराठी मुलाने बॉलीवूड गाजवल्यामुळे प्रेक्षकांचे रितेश वर विशेष प्रेम आहे. २००३ साली तुझे मेरी कसम या चित्रपटातुन रितेश ने त्याच्या कामाला सुरुवात केली. बघता बघता २० वर्षाच्या कारकिर्दीत रितेश ने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटवला आहे. ब्लॉकब्लस्टर, हाऊसफुल्ल, ग्रँडमस्ती असे बरेच चित्रपट रितेशने केले. जितकं प्रेम त्याला सकरात्मक भूमिकेनंसाठी मिळालं तितकंच प्रेम त्याला एक विलंन या चित्रपटातील त्याच्या नकारात्मक भूमिकेसाठी ही मिळालं.(Ritesh Deshmukh)
रितेशच मराठी इंडस्ट्री मधील पदार्पण त्याच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरला असा म्हंटल तर काही चुकीचं ठरणार नाही. लय भारी या त्याच्या मराठी चित्रपटाने त्याला प्रेक्षकांच्या मनात कायमच स्थान मिळवून दिल आहे.आणि याच मराठी मुलाने दिग्दर्शनातील पदार्पणासाठी ही मराठी चित्रपटाचीच निवड केली. त्याच त्याच्या वेड या चित्रपटाने अख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.
हे देखील वाचा- ‘आपली चूक मान्य करावी’ म्हणतं रितेशने धरले जिनीलियाचे पाय
महाराष्ट्राचा डॉन….
त्याच्या कामा सोबतच तो त्याच्या हटके फोटोशूटमुळे कायम चर्चेचा विषय असतो. रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून एक फोटो शेअर केला आहे.आणि प्रेक्षकांनीही लाईक्स व कमेंट्स मधून त्याच्या त्या फोटो वर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तशा अनेक कमेंट त्या फोटो वर आपल्याला पाहायला मिळतील परंतु एका चाहत्याची कमेंट आपले लक्ष वेधून घेते, त्या कमेंट मध्ये रितेशला महाराष्ट्राचा डॉन म्हंटल आहे.त्याच्या या फोटोखालील कमेंटनुसार त्याच्या अभिनयानं, त्याच्या कर्तृत्वान, कामगिरीने तो खरच महाराष्ट्राचा डॉन आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.(Ritesh Deshmukh)
रितेश आणि जेनेलिया वैयक्तिकरित्या प्रेक्षकांच्या जितक्या आवडीचे आहेत. तितकेच प्रेम जोडी म्हणून ही त्यांच्या वर केले जाते. आजच्या युथसाठी ते कपलगोल्स आहेत. जोडीदार म्हणून सुद्धा हे कपल तरुणपिढच आदर्श आहेत.रितेशने दिग्दर्शित केलेल्या वेड या चित्रपटातून जेनिलियान सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण केले. तसेच तिचा हा मराठी भाषेतील पहिला चित्रपट आहे. जोडीदार म्हणून तर झालंच पण आई वडील म्हणून ही रितेश जेनिलियाच आपण कौतुक होताना बघतो. याच कारण त्यांच्या मुलांचे कधी प्रार्थना म्हणतानाचे तर कधी मीडियाला नमस्कार करतानाचे अनेक व्हिडीओ आपण पाहतो. रितेश च्या या गुणांमुळेच प्रेक्षकांना तो आपलासा वाटतो.