tanushree dutta crying shared a video : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती प्रचंड रडत आहे. या व्हिडीओमध्ये तनुश्री सांगत आहे की, ती तिच्या स्वत: च्या घरात सेफ नाही आहे. आणि म्हणूनच शेवटी तिला आज पोलिसांना कॉल करावा लागला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तनुश्री ढसाढसा रडत आहे. सोशल मीडियावर तनुश्री बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “मी या छळाला कंटाळले आहे. हे सर्व २०१८ पासून चालू आहे”.
तनुश्री या व्हिडीओमध्ये प्रचंड अस्वस्थ व रडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सांगते, “मी आता या त्रासाला कंटाळले आहे. २०१८ पासून या सगळ्या गोष्टी सुरु आहेत. #Metoo नंतर हे सगळं सुरु झालं पण, आता मला सहन होत नाही आहे म्हणूनच मी पोलिसांना फोन केला. कृपया मला कोणीतरी मदत करा. खूप उशीर होण्याआधी कृपया काहीतरी करा”, अशी विनंती अभिनेत्रीने व्हिडीओद्वारे केली आहे.
आणखी वाचा – आदित्य पारुला मंगळसूत्र घालू शकेल का?, लग्नाचं सत्य किर्लोस्कर कुटुंबासमोर येणार का?, मोठा ट्विस्ट
या व्हिडीओमध्ये तनुश्री खूप रडताना दिसत आहे. आणि ती रडत रडत ती पुढे म्हणते, “माझ्या स्वतःच्या घरातच माझा छळ होत आहे. याबाबत मी पोलिसांना फोन केला होता. त्यांनी मला रितसर तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं आहे. माझी प्रकृती सध्या ठीक नाही आहे, त्यामुळे मी उद्या किंवा परवा पोलीस स्टेशनमध्ये जाईन. गेल्या ४-५ वर्षांत माझी प्रकृती खूपच बिघडली आहे. माझं संपूर्ण घर अस्ताव्यस्त झालं आहे”.
आणखी वाचा – ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील कलाकारांना तगडं मानधन, स्मृती इराणी यांची सर्वाधिक कमाई, रक्कम तब्बल…
शेवटी अभिनेत्री म्हणाली, “माझ्या घरात काम करण्यासाठी मी मदतनीस सुद्धा ठेवली नाही. कारण, मला मदतनीसांच्या बाबतीत चांगला अनुभव आलेला नाही. त्यांनी माझ्या घरात चोरीचा प्रयत्न केल्याने आता मी कोणालाच कामावर ठेवणार नाही. सगळं काम मी एकटी करते, मला मदतीची खरंच खूप गरज आहे”, असं तनुश्रीने या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.





