शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील कलाकारांना तगडं मानधन, स्मृती इराणी यांची सर्वाधिक कमाई, रक्कम तब्बल…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 23, 2025 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kyunki saas bhi kabhi bahu thi cast fees

'क्योंकि सास भी कभी बहू थी' मालिकेतील कलाकारांना तगडं मानधन, स्मृती इराणी यांची सर्वाधिक कमाई, रक्कम तब्बल...

kyunki saas bhi kabhi bahu thi cast fees : ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका २९ जुलै २०२५ रोजी सुरु होणार आहे. या शोमध्ये स्मृति इराणी पुन्हा एकदा तुळशी विराणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या शोबद्दल चाहते खूप उत्साही आहेत. आणि या शोची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आज आपण या मालिकेतील कलाकारांच्या फीबद्दल सांगणार आहे. जया भट्टाचार्य यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्यांनी शोला सात वर्षे दिली पण त्यांना हवा तितका आदर मिळाला नाही. आणि पैसेही वाढविण्यात आले नाहीत. त्या म्हणाल्या की, त्यांचे मानधन एक हजार रुपयांनी वाढले होते, तर त्याचवेळी इतरांच्या मानधनात अधिक वाढ झाली होती.

अहवालानुसार, या कार्यक्रमात अमर उपाध्यायला प्रति भाग १ लाख रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. मालिकेत तो मिहिर विराणीच्या भूमिकेत दिसेल. स्मृती इराणी १८०० पासून थेट प्रत्येक भागासाठी १४ लाख रुपये शुल्क आकारत आहे. हितेन तेजवानचे मानधन एक लाख ते १.५ लाख आहे असे म्हटलं जातं. यामध्ये त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव करण विराणी आहे. नंदिनी विराणीची भूमिका साकारत असलेल्या गौरी प्रधान प्रति एपिसोडसाठी ८०,००० ते १.५ लाख मिळवत असल्याची नोंद आहे.

आणखी वाचा – ‘शिवा’ मालिका बंद होणार?, पूर्वा कौशिकच्या ‘त्या’ इंस्टाग्राम स्टोरीने चर्चांना उधाण, प्रेक्षकांचीही नाराजी

तर अभिनेते शक्ती आनंद या शोमध्ये पुन्हा दिसणार आहेत आणि त्यांना प्रति भाग ८०,००० ते १.५ लाख मिळण्याची अपेक्षा आहे. कमलिका गुहा ठाकुरता या शोसाठी प्रति भाग ५०,००० ते १ लाख शुल्क आकारत आहे. दक्षता बेनच्या भूमिकेत दिसणारी केतकी दवे देखील प्रत्येक भागासाठी ५०,००० ते १ लाख शुल्क आकारेल.

आणखी वाचा – महागडं हॉटेल, रिसॉर्टला न जाता नाटकाच्या सेटवर वनिता खरातच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, कुटुंबियांसहही धमाल, व्हिडीओ व्हायरल

‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अशातच आता ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’चं दुसरं पर्व लवकरच सुरु होणार आहे. त्यानिमित्ताने मालिकेच्या पहिल्या पर्वातील सर्व कलाकार पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. तुलसी व मिहिर ही जोडी खूप प्रसिद्ध झाली होती. आता ही जोडी लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटी मालिकेचं दुसरं पर्व सुरु होणार आहे.

Tags: entertainmentKyunki Saas Bhi Kabhi Bahu Thitelevision serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Paaru Marathi Serial

आदित्य पारुला मंगळसूत्र घालू शकेल का?, लग्नाचं सत्य किर्लोस्कर कुटुंबासमोर येणार का?, मोठा ट्विस्ट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.