शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आशू-शिवा कायमचं एकमेकांपासून दूर होणार, नात्यामध्ये दुरावा?, मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 19, 2024 | 5:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shiva marathi serial update shiva and ashu will separate from each other by getting divorced new promo viral on social media

आशू-शिवा एकमेकांपासून होणार कायमचे विभक्त?, मालिकेत मोठा ट्विस्ट

झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ ही मालिका अल्पवधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर हे दोघेही मुख्य भूमिकेत आहे. सध्या मालिकेत शिवाच्या आयुष्यात चढ-उतार येताना दिसत आहेत. सतत तिला कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या कुटुंबासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, तिचा पती आशू व सासू हे कायम तिच्यावर अविश्वास दाखवतानाचे मालिकेत पाहायला मिळत आहे. (shiva marathi serial update)

शिवाने तिच्या समोरील संघर्षाला आणि संकटाना सामोरं जात आलेल्या समस्यांवर उत्तर शोधण्याचं ठरवले आहे. तणाव वाढत असताना, आशू, शिवाबद्दलच्या त्याच्या खऱ्या भावना जाणून घेण्यासाठी चंदनसमोर उभा ठाकतो. दरम्यान, दिव्या परिस्थितीचा फायदा घेत चंदनला तिचे गुपित उघड करु नये म्हणून ब्लॅकमेल करते. शिवा आशूला पाठींबा देत राहते, पण दबावामुळे त्यांचं नातं कमकुवत होतं. अशातच या दबावामुळे हे कायमचे एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – झी मराठीवर ‘तुला जपणार आहे’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रोमोमध्येच मृत व्यक्तीचा प्रेमळ वावर, नक्की काय?

या नवीन प्रोमोमध्ये सिताई शिवाला घटस्फोटाचे पेपर देत म्हणते की, “हे तुझे व शिवाचे घटस्फोटाचे पेपर. तू या पेपर्सवर सह्या कर आणि या नात्यातून मोकळा हो”, सिताईने असे म्हटल्यानंतर दिव्याने शिवाबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या त्याला आठवतात. त्या सर्व खऱ्या आहेत, असे तो समजतो. यानंतर आशू घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करतो. पुढे सिताई शिवाच्या घरी जात शिवा व तिच्या संपूर्ण कुटुंबाला म्हणते, “आशूने या डिव्होर्स पेपरवर सह्या केल्यात. त्यामुळे तू आता मान्य कर की, या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच होता”.

आणखी वाचा – ‘पुष्पा २’ चित्रपट ‘या’ दिवशी ओटीटीवर होणार प्रदर्शित, नेटफ्लिक्सने तब्बल २७५ कोटी रुपयांना खरेदी केले राईट्स

सिताईचे हे म्हणणे ऐकताच शिवा व कुटुंबाला याचा मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. शिवा व आशूमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी दिव्याने त्याला शिवाबद्दल अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. आशूनेदेखील त्यावर विश्वास ठेवला. दरम्यान, आता संपूर्ण प्रकरणी शिवा काय करणार?, ती सहजासहजी हार मानणार का? की कीर्ती व दिव्याने घडवून आणलेल्या या सर्व करस्थानाचा ती पर्दाफाश करणार? हे लवकरच प्रेक्षकांना आगामी भागातून पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi serialshiva marathi serialshiva marathi serial update
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
sargun mehta on ravi dube

"कधी चाबूकने मारते तर कधी…", रवी दुबेची बायकोबाबत गोड तक्रार, म्हणाला, "एखादी गोष्ट आवडली नाही तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.