सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा २: द रुल’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त कमाई करत सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. पहिल्याच आठवड्यात मोठ्या प्रमाणात कलेक्शन केले.तसेच दुसऱ्या वीकेंडलाही या दमदार कमाई केली आणि हा देशातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. ‘पुष्पा 2: द रुल’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या १२ दिवसांत अनेक टप्पे पार केले असून रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई करत असतानाच आता प्रेक्षक ओटीटीवर येण्याची वाट बघत आहेत. याबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे. (pushpa 2 on ott release)
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट बघत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या रिपोर्टनुसार, ‘नेटफ्लिक्स’ने २७५ कोटी रुपयांमध्ये चित्रपटाचे राईट्स खरेदी केले आहेत. मात्र तरीही प्रेक्षकांना थोडी वाट बघावी लागणार आहे.
चित्रपट ओटीटीवर कधी दिसणार? याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र तुम्हाला जर अंदाज लावायचा असेल तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सहा ते आठ आठवड्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जातो. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, चाहत्यांना चित्रपट ऑनलाइन बघायचा असेल तर फेब्रुवारी २०२५ पर्यंत वाट बघावी लागणार आहे. तसेच GQ च्या रिपोर्टनुसार, चाहते १५ ते ३० जानेवारी या दरम्यान घरबसल्या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतात.
‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट ओटीटीवर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी या भाषांमध्ये पाहता येणार आहे. ‘पुष्पा 2: द रुल’च्या कलेक्शनबद्दल सांगायचे तर, ‘पुष्पा 2: द रुल’ने पहिल्या आठवड्यात ७२५.८ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर नवव्या दिवशी ३६.४ कोटींची कमाई झाली. दहाव्या दिवशी ६३.३ कोटी रुपये आणि अकराव्या दिवशी कमाई ७६.६ कोटी रुपये होती. तसेच बाराव्या दिवशी २७.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.