टेलिव्हिजनवरील रवी दुबे व सरगुन मेहता ही जोडी अधिक लोकप्रिय जोडी आहे. रवी व सरगुन दोघांनीही आपली एक वेगळी जागा मनोरंजन क्षेत्रात निर्माण केली आहे. रवी आजही हिंदी मालिकांमध्ये काम करताना दिसतो मात्र सरगुन मेहताने पंजाबी इंडस्ट्रीकडे आपलं पाऊल वळवलं. अनेक पंजाबी चित्रपटातून तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. आणि पंजाबी सिनेसृष्टीची ती सुपरस्टार बनली. आता ती पती रवी दुबेबरोबर एक प्रॉडक्शन हाऊसही चालवते. या प्रॉडक्शन हाऊसचे शो खूप पसंत केले जातात. रवी व सरगुनची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दोघेही अनेकदा सार्वजनिक व्यासपीठावर एकमेकांचे कौतुक करताना दिसतात. अशातच आता त्यांच्याबद्दलही एक नवीन अपडेट समोर आली आहे. (sargun mehta on ravi dube)
सरगुन व रवीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये सरगुन म्हणाली की, “रवीने मला आजवर काहीही बघण्यापासून थांबवलं नाही. या नात्याबद्दल मला कधीही विचार करावा लागला नाही. आमच्यावर कधीही ही वेळ आली नाही. मी त्याला कधीही हा पर्यायच दिला नाही. याबरोबर किंवा याशिवाय बस्स बाकी काहीही नाही. माझ्यासाठी जे असणार ते याच्याबरोबरच असणार आहे”.
पुढे ती म्हणाली की, “मला जर त्याच्याबद्दलची एखादी गोष्ट आवडली नाही तर मी त्याला मारते”. इतकं बोलून सरगुन त्याला मारते. दोघंही हसतात. नंतर रवी म्हणतो की, “तो एक चित्रपट आहे ना ‘कभी खुशी कभी गम’ तसच आमचं आहे ‘कधी चाबूक कधी कोपर’”. हे बोलून सगळेच हसू लागतात.
आणखी वाचा – आशू-शिवा कायमचं एकमेकांपासून दूर होणार, नात्यामध्ये दुरावा?, मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट
दरम्यान काही दिवसांपूर्वी संगीतकार जानीबरोबर सरगुनचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र स्वतः जानीने असं काही नसल्याचा खुलासा केला होता. रवी व सरगुन यांनी ७ डिसेंबर २०१३ साली लग्न केले. दोघांनी त्यांच्या त्यांच्या करियरमध्ये खूप प्रगती केली आहे. दोघांनी मिळून एक प्रोडक्शन हाऊसदेखील सुरु केले आहे. त्यांच्या टीव्हीशोलादेखील चाहत्यांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आहे. आता युट्यूबवर त्यांचा एक प्रेम कहाणीवर आधारित ड्रामादेखील येणार आहे.