झी मराठी वाहिनीवरील ‘शिवा’ ही मालिका अल्पवधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका आहे. या मालिकेत अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि शाल्व किंजवडेकर हे दोघेही मुख्य भूमिकेत आहे. सध्या मालिकेत शिवाच्या आयुष्यात चढ-उतार येताना दिसत आहेत. सतत तिला कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे पाहायला मिळते. ती तिच्या कुटुंबासाठी प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालत असल्याचे पाहायला मिळते. मात्र, तिचा पती आशू व सासू हे कायम तिच्यावर अविश्वास दाखवतानाचे मालिकेत पाहायला मिळत आहे. (shiva marathi serial update)
शिवाने तिच्या समोरील संघर्षाला आणि संकटाना सामोरं जात आलेल्या समस्यांवर उत्तर शोधण्याचं ठरवले आहे. तणाव वाढत असताना, आशू, शिवाबद्दलच्या त्याच्या खऱ्या भावना जाणून घेण्यासाठी चंदनसमोर उभा ठाकतो. दरम्यान, दिव्या परिस्थितीचा फायदा घेत चंदनला तिचे गुपित उघड करु नये म्हणून ब्लॅकमेल करते. शिवा आशूला पाठींबा देत राहते, पण दबावामुळे त्यांचं नातं कमकुवत होतं. अशातच या दबावामुळे हे कायमचे एकमेकांपासून वेगळे होणार असल्याचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये सिताई शिवाला घटस्फोटाचे पेपर देत म्हणते की, “हे तुझे व शिवाचे घटस्फोटाचे पेपर. तू या पेपर्सवर सह्या कर आणि या नात्यातून मोकळा हो”, सिताईने असे म्हटल्यानंतर दिव्याने शिवाबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या त्याला आठवतात. त्या सर्व खऱ्या आहेत, असे तो समजतो. यानंतर आशू घटस्फोटाच्या पेपरवर सह्या करतो. पुढे सिताई शिवाच्या घरी जात शिवा व तिच्या संपूर्ण कुटुंबाला म्हणते, “आशूने या डिव्होर्स पेपरवर सह्या केल्यात. त्यामुळे तू आता मान्य कर की, या नात्याचा प्रवास एवढ्यापर्यंतच होता”.
सिताईचे हे म्हणणे ऐकताच शिवा व कुटुंबाला याचा मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. शिवा व आशूमध्ये गैरसमज निर्माण करण्यासाठी दिव्याने त्याला शिवाबद्दल अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. आशूनेदेखील त्यावर विश्वास ठेवला. दरम्यान, आता संपूर्ण प्रकरणी शिवा काय करणार?, ती सहजासहजी हार मानणार का? की कीर्ती व दिव्याने घडवून आणलेल्या या सर्व करस्थानाचा ती पर्दाफाश करणार? हे लवकरच प्रेक्षकांना आगामी भागातून पाहायला मिळणार आहे.