शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्वचेसाठी ट्रिटमेंट घेतली अन्…; शेफाली जरीवालाच्या निधनाबाबत जवळच्या मैत्रिणीचे धक्कादायक खुलासे

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 1, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shefali Jariwala death reason

मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्वचेसाठी ट्रिटमेंट घेतली अन्...; शेफाली जरीवालाच्या निधनाबाबत जवळच्या मैत्रिणीचे धक्कादायक खुलासे

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वालाच मोठा धक्का बसला. अवघ्या ४२व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. शेफालीचा पती पराग त्यागी आणि संपूर्ण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सगळं काही सुरळीत सुरु असताना अचानक शेफालीला काय झालं? अशा विविध चर्चा सुरु झाल्या. तरुण दिसण्यासाठी शेफाली घेत असलेल्या औषधांमुळे हे सगळं झालं का? असेही तर्क लावले गेले. मात्र हृदय विकाराच्या झटक्यामुळेच शेफालीचं निधन झालं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सततच्या नकारात्मक चर्चा, तिच्या मृत्यूचं कारण यामुळे कुटुंबालाही त्रास होत आहे. पण यासगळ्यामध्ये शेफालीची जवळची मैत्रीण पूजा घई हिने बरेच खुलासे केले आहेत. यामुळे शेफालीला नक्की काय झालं होतं? हे समोर आलं आहे. (Shefali Jariwala death reason)

शेफाली एंटी एजिंग ट्रिटमेंट घेत होती हे तिच्या निधनानंतर डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र त्याचा हृदयविकाराच्या झटक्याशी काहीही संबंध नाही हेही त्यांनी स्पष्ट केलं होतं. अशातच विक्की ललवानीला दिलेल्या मुलाखतीत पूजाला शेफालीच्या याच ट्रिटमेंटबाबत विचारण्यात आलं. तेव्हा तिने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिलं. सततच्या होणाऱ्या नकारात्मक चर्चांना पूजाने फुलस्टॉप दिला आहे.

आणखी वाचा – “चित्रपट नाही मुजरा बघायला जा”, चित्रपटांच्या वाढत्या दरांचा परेश रावलला त्रास, थिएटरमध्ये विश्रांती घ्यायला जाणाऱ्यांनाही टोकलं

View this post on Instagram

A post shared by Shefali Jariwala 🧿 (@shefalijariwala)

पूजा म्हणाली, “कोणावरही खासगी कमेंट करणं योग्य नाही. मला असं वाटतं अशाप्रकारची ट्रिटमेंट प्रत्येकजण घेत असतो. आणि प्रत्येकाला याची गरजही आहे. ही ट्रिटमेंट अगदी सर्वसामान्य आहे. तुम्ही जर दुबईमध्ये गेलात तर प्रत्येक रस्त्यावरील क्लिनिकमध्ये, सलॉनमध्ये व्हिटॅमिन सी ड्रिप दिसतील. अंतिम संस्कारांसाठी शेफालीला जेव्हा घरी आणण्यात आलं तेव्हा खूप दुःख झालं. पण तरीही ती खूप सुंदरच दिसत होती”. मित्र मंडळींमध्ये शेफालीच सुंदर दिसत असल्याचं पूजाने सांगितलं.

आणखी वाचा – आमिर, शाहरुख व सलमान खान रात्रभर पितात दारू, एकमेकांबरोबर बरेच वाद करुनही…; मिस्टर परफेक्शनिस्टकडून पोलखोल

पुढे पूजा म्हणाली, “व्हिटॅमिन सी घेणं हे खूपच सामान्य आहे. काही लोक याची फक्त गोळी घेतात. तर काही जणं IV ड्रिप लावून ट्रिटमेंट घेतात. निधनाच्या दिवशीही शेफालीने IV ड्रिप घेतलं होतं. कारण ज्या व्यक्तीने IV ड्रिप शेफालीला दिलं होतं त्याचीही चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याच्या बोलण्यामधून तिच्या या ट्रिटमेंटबाबत माहिती समोर आली”. शेफालीच्या अंतिस संस्कारादरम्यान पूजा होती. तिने यादरम्यान संपूर्ण परिस्थिती सांभाळली. पूजाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती शेफालीची बहीण आहे असं बोलण्यात आलं होतं.

Tags: bollywood newsentertainment newsShefali Jariwala
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
Rakhi Sawant Video

"प्लास्टिक शस्त्रक्रियेसाठी का जातेस?", शेफालीच्या मृत्यूबाबत बोलणं राखी सावंतला पडलं महागात, नेटकरी म्हणाले, "मृत्यूची चेष्टा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.