इंडस्ट्रीत काम करत असताना कलाकार एकमेकांचे घट्ट मित्र होऊन जातात. मात्र ही मैत्री फार कमी कलाकारांच्या नशिबी शेवटपर्यंत टिकून राहते. फार कमी मैत्री होते यामागचं कारण म्हणजे कामामधून निर्माण झालेली स्पर्धा. यामध्येच कॅमेऱ्यासमोरच एकमेकांबाबत विविध गोष्टी बोलल्या जातात. असंच काहीसं आमिर खान व शाहरुख खानबाबत झालं होतं. आमिर व शाहरुख यांच्या मैत्रीमध्ये काही वर्षांपूर्वी दुरावा आला. गैांपूर्वी दुरावा आला. सर्वी बरेचरसमजामधून दोघंही एकमेकांबाबत कॅमेऱ्यासमोर बरंच काही बोलले. मात्र आता दोघांमध्ये पुन्हा मैत्री झाली आहे. याचबाबत आमिरने मोठा खुलासा केला आहे. (aamir khan drink with shahrukh salman)
लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत आमिरने शाहरुखबरोबरची मैत्री, वाद याबाबत भाष्य केलं. आमिर म्हणाला, “शाहरुख नेहमीच माझ्याबरोबर मजा-मस्ती करत असतो. दरवर्षी पुती करत असतो. दरवर्षी करवर्षी कारस्कार सोहळाही होतो. त्यामध्येही तो माझ्याशी मस्ती करतो”. पुरस्कार सोहळ्याला का जात नाही? यावरही आमिर पुढे म्हणाला. त्याने सांगितलं की, “माणसाकडे आयुष्य एकच आहे आणि त्यामध्येही वेळ कमी आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा योग्य उपयोग केला पाहिजे असं मला वाटतं. जिथे माझं जायचं मन होतं तिथेच मी जातो. पुरस्कार सोहळ्याला जाण्याचं माझं मन होत नाही. जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये नवीन होतो तेव्हा दोन ते तीन वर्ष गेलो. वर्षातून एकदाच इंडस्ट्रीतील सगळे लोक प्रत्येकाचं काम सेलिब्रेट करायला पुरस्कार सोहळ्यांमध्ये एकत्र जमतात. मात्र हळूहळू मला कळायला लागलं की, इथे इतर काही गोष्टीही चालतात”.
शाहरुख खानने आमिर ज्यापद्धतीने चित्रपटाचं प्रमोशन करतो ते बालिशपणासारखं असतं अशी टीका केली होती. यावर आमिर म्हणाला, “एक काळ असा होता की, आमिर आणि माझ्यामध्ये खूप काही सुरु होतं. आम्ही एकमेकांबाबत खूप काही बोलत होतो. बहुतेक तो माझ्यावर नाराज होता. यामागचं कारण मला माहित नाही. कारण मी माझ्या मुलाखतीत इतरांबाबत बोलत नाही. मी फक्त माझ्याविषयीच बोलतो. जाऊदेत आता सोडून द्या हे सगळे विषय”.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेता उभारतोय स्वप्नातील बंगला, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक, कौतुकाचा वर्षाव
“शाहरुख माझा खूप चांगला मित्र आहे. आमच्या दोघांचं करिअर जेव्हा सुरु झालं तेव्हा एक स्पर्धा होती. पण १० ते १५ वर्षांपूर्वीच शाहरुख व माझ्यामधील सगळी अडचण दूर झाली. माझ्याकडून तरी सगळं संपलं आहे. माझ्यामते त्याच्या मनातही आता माझ्याविषयी काही नाही. आम्ही बऱ्याचदा एकत्र दारूही प्यायलो आहे. एका ड्रिंकमध्ये आमचं काहीच होत नाही. शाहरुख, सलमान आणि मी सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत दारू प्यायलो आहे. ८ ते १० वेळा असं झालं आहे. मी सगळ्यांना आताच सांगतो की, दारू, सिगारेटपासून लांब राहा. या गोष्टी अजिबात चांगल्या नाहीत”. आमिरने अगदी दिलखुलासपणे उत्तर दिलं.





