छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेतून शशांकने साकारलेल्या श्री या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला. या मालिकेमुळे शशांकला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय अनेक मराठी मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली. सध्या शशांक ‘मुरांबा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. (Shashank Ketkar Post)
सोशल मीडियावर ही शशांक बऱ्यापैकी सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. या शिवाय विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे भाष्य करण्यात शशांक नेहमीच तत्पर असतो. त्याला न पटलेले मुद्दे तो वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. विशेषतः सामाजिक मुद्द्यांकडे त्याचा कल अधिक असलेला पाहायला मिळतो. अशातच शशांकने शेअर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
शशांकने शेअर केलेल्या या पोस्टमधून नागरिकांना व महानगरपालिका या दोघांनाही टोला लगावला आहे. ‘याची सुरुवात आपणच करुया’ या असायची पोस्ट त्याने शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावरील कचराकुंडीबाहेर पडलेला कचरा, दुर्गंधी, मोडक्या कचराकुंड्या आणि त्याच्या मागील भिंतीवर लिहिलेले स्वच्छतेचा संदेश हे सर्व व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. “रस्ते, शहर, परिसर स्वच्छ ठेवणं ही आपली आणि महानगर पालिकेची जबाबदारी आहे. जिथे या ओळी लिहिल्या आहेत, तिथेच तुटलेल्या मोडलेल्या कचऱ्याच्या २ पेट्या ठेवल्या आहेत. हो आपण एकत्र येऊन हे करु शकतो. पण हा बदल आपल्याला खरंच पाहिजे आहे का? असा प्रश्न विचारत त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
शशांकने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला पाठिंबा दर्शविला आहे. तर आपण खरंच एकत्र येत यात बदल करायला हवा अशा अनेक कमेंट केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला होता. पण या व्हिडीओमध्ये कोणी व्यक्ती नसून खेचर हा प्राणी दिसत होता. यामध्ये खेचर दारुची बॉटल तोंडाने पकडताना दिसला. समुद्रकिनारी दारुची बॉटल पाहता शशांकने त्याच्या मोबाईमध्ये हा व्हिडीओ शूट केला. व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटलं की, “नको रे नको सवय वाईट”. शशांकने शूट केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.