शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जुई गडकरीची पहिली कमाई आली समोर, अभिनेत्री स्वतः खुलासा करत म्हणाली…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 14, 2024 | 7:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui Gadkari First Earning

लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जुई गडकरीची पहिली कमाई आली समोर, अभिनेत्री स्वतः खुलासा करत म्हणाली…

टीआरपीच्या शर्यतीत प्रथम क्रमांक टिकवून ठेवणाऱ्या मालिकेचं नाव म्हणजे ‘ठरलं तर मग’. ही मालिका प्रदर्शित झाल्यापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील पात्रांमुळे आणि त्यांच्या अभिनयामुळे ही मालिका अव्वल स्थान टिकवून आहे. मालिकेतील अर्जुन व सायलीवर तर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसते आहे. या मालिकेमुळे जुई लोकप्रियतेच्या शिखरावर आली. या मालिकेतील तिच्या पात्राला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत. (Jui Gadkari First Earning)

अभिनयाबरोबरच जुई सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावरुन ती सेटवरील धमाल मस्ती, तसेच बीटीएस शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकतंच सोशल मीडियावरुन ‘आस्क मी सेशन’ घेतलं होतं. यादरम्यान तिने नेटकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तर दिली. मात्र या सेशनमधील एका प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्यात जुईला तिच्या पहिल्या कमाई बद्दल प्रश्न विचारला गेला होता.

आणखी वाचा – खऱ्या आयुष्यातील अर्जुनबाबत जुई गडकरीने केला खुलासा, नेटकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाली, “लवकरच मी…”

पहिल्या कमाईबद्दल सांगताना जुई म्हणाली, “माझी पहिली कमाई आठशे रुपये होती. दुसरीत असताना मी शोमध्ये गायले होते. तेव्हा त्याचे आठशे रुपये मिळाले होते. आठशेपैकी पाचशे रुपये पैशाच्या स्वरुपात आणि उरलेल्या तीनशे रुपयांचं बक्षिस मिळालं होतं”. तसेच अभिनेत्रीच्या आणखी एका चाहत्याने “अभिनय क्षेत्रात काम करण्यापूर्वी तू फिरायला जाण्यासाठी पैसे कुठून जमा करायची?” असा प्रश्न विचारला यावर उत्तर देत जुई म्हणाली, “मी वयाच्या आठव्या वर्षापासून काम करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे अर्थात मी फिरायला वगैरे आधीपासून पैसे साठवले होते” असं ती म्हणाली.

आणखी वाचा – “स्वतःला रेप्रेझेन्ट करता आणि…”, तेजश्री प्रधानने ट्रोलर्सबाबत केलं भाष्य, अभिनेत्री सल्ला देत म्हणाली, “आमच्याबद्दल बोलताना…”

जुई गडकरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेमुळे अभिनेत्रीचं नशीब बदललं. यामध्ये जुईने साकारलेल्या कल्याणी पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर ती ‘वर्तुळ’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘सरस्वती’ या मालिकेतही दिसली. यानंतर ‘बिग बॉस मराठी’मुळे ती पुन्हा चर्चेत आली होती.

Tags: entertainmentjui gadjkarijui gadkari earningsjui gadkari paymentmarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Next Post
Shashank Ketkar Post

रस्त्यावर पडलेला कचरा, घाण अन्…; शशांक केतकरने जबाबदारी दर्शवणारी केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, "महानगर पालिकेने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.