Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आमिर खानने मुंबईत त्याची मुलगी आयरा खान व जावई नुपूर शिखरे यांच्यासाठी ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. ज्यामध्ये आमिर खानच्या संपूर्ण कुटुंबाव्यतिरिक्त बी-टाऊनमधील दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली होती. मात्र या रिसेप्शन सोहळ्याला आमिर खानची पूर्वश्रीमीची पत्नी किरण राव हिची अनुपस्थिती पाहायला मिळाली. दरम्यान किरण यांच्या गैरहजेरीचं कारण समोर आलं आहे.
आयरा खान व नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारीला नोंदणी पद्धतीने विवाह केल्यानंतर १० जानेवारीला उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने त्यांनी लग्न केले. यानंतर १३ जानेवारीला आमिर खानने नवविवाहित जोडप्यासाठी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये भव्य रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या रिसेप्शन सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहेत. आयरा-नुपूरच्या या स्वागत समारंभाला बॉलिवूडसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनी तसेच नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. त्याचवेळी, आयरा खानची सावत्र आई म्हणजेच आमिर खानची पुर्वश्रमीची पत्नी किरण राव गैरहजर असलेली पाहायला मिळाली.
किरण राव आयरा-नूपूरच्या रिसेप्शनला का आली नाही, असा प्रश्न नेटकऱ्यानी उपस्थित केला. याआधी लग्नापुर्वीच्या विधींपासून किरणने लेकीच्या लग्नात सहभाग दर्शविला होता. त्यामुळे रिसेप्शनला किरण राव का नाहीत असा प्रश्न साऱ्यांनाच भेडसावत होता. अशातच किरण रावने रिसेप्शनला हजर न राहण्याचे कारणही समोर आलं आहे. आमिर खानने स्वतः पापाराझींसमोर याचा खुलासा केला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेव्हा पापाराझींनी प्रश्न विचारला तेव्हा आमिर किरणजींची तब्येत ठीक नसल्याचे सांगताना दिसला. “तिला व्हायरल ताप आहे, त्यामुळे ती येऊ शकली नाही पण तिची टीम इथे हजर आहे”, असंही तो म्हणाला.
आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीत मुकेश अंबानी पत्नी नीता अंबानीसह पोहोचले होते. याशिवाय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान पत्नी गौरी खानसह हजर होता. याशिवाय सलमान खान, रेखा, हेमा मालिनी, सायरा बानू, शर्मन जोशी, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, अनिल कपूर, सचिन तेंडुलकर, कार्तिक आर्यन, साक्षी तन्वर, कमल हसन यांच्या मुली श्रुती व अक्षरा, धर्मेंद्र, कपिल शर्मा, सुष्मिता यांनी हजेरी लावली होती.