सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकाविश्वात लोकप्रिय असणाऱ्या जुई गडकरीने व्यक्त केली चित्रपटात काम करण्याची इच्छा, म्हणाली, “कोणी ऑफर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 15, 2024 | 10:08 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui Gadkari On Movie

मालिकाविश्वात लोकप्रिय असणाऱ्या जुई गडकरीने व्यक्त केली चित्रपटात काम करण्याची इच्छा, म्हणाली, "कोणी ऑफर…"

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिका प्रदर्शित झाल्यापासून या मालिकेने, मालिकेच्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतून सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. मालिकेत सायली ही भूमिका जुई गडकरी साकारत आहे. या मालिकेतील भूमिकेतून जुई तिच्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेआधी जुई छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकत आली. (Jui Gadkari On Movie)

‘पुढचं पाऊल’ या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे जुईच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. याशिवाय ती ‘वर्तुळ’, ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’, ‘सरस्वती’ या मालिकेतही दिसली. ‘बिग बॉस’ मराठीमुळे जुई चर्चेत आलेली पाहायला मिळाली. छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या जुईला मात्र चित्रपटांमध्ये काम करताना फारच कमी पाहायला मिळालं. मालिकाविश्वात सक्रिय असणारी जुई चित्रपटात केव्हा दिसणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

आणखी वाचा – रस्त्यावर पडलेला कचरा, घाण अन्…; शशांक केतकरने जबाबदारी दर्शवणारी केलेली पोस्ट चर्चेत, म्हणाला, “महानगर पालिकेने…”

सोशल मीडियावर जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सेटवरील बीटीएस व्हिडीओ तसेच अनेक ट्रेंडिंग रील्स ती शेअर करताना दिसते. अशातच जुईने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. जुईने इंस्टाग्राम अकाऊंटवरून आस्क मी एनिथिंग हे सेशन घेतलं होत. यादरम्यान जुईला चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची तिने अगदी मनमोकळेपणाने उत्तर दिलेली पाहायला मिळाली. अशातच एका चाहत्याने जुईला तुला चित्रपटात काम करायला आवडत नाही का? असा प्रश्न विचारला असता, यावर उत्तर देत जुई म्हणाली, “आवडेल ना नक्कीच. पण मला कोणी चांगला चित्रपट ऑफर करतच नाही” असं उत्तर दिलेलं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या जुई गडकरीची पहिली कमाई आली समोर, अभिनेत्री स्वतः खुलासा करत म्हणाली…

यादरम्यान जुईने चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जुईने केलेल्या या पोस्टनंतर तिला नक्कीच एखाद्या चांगल्या चित्रपटाची ऑफर येईल, यांत शंका नाही. त्यामुळे आता जुई मोठ्या पडद्यावर दिसणार का? याकडे आता चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Tags: entertainmentjui gadjkarijui gadkari on moviejui gadkari postmarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Rinku Rajguru and Akash Thosar

"तारीख काय ठरली", रिंकू राजगुरू व आकाश ठोसरच्या रोमँटिक फोटोंमुळे चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले, "पळून लग्न…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.