Shalva Kinjawadekar And Shreya Daflapurkar : सध्या सिनेविश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. मालिकाविश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर नुकताच विवाहबंधनात अडकला. शाल्वने फॅशन डिझाइनर श्रेया डफळापूरकरसह लग्नगाठ बांधली आहे. शाल्व व श्रेया यांच्या शाही विवाहसोहळ्याच्या फोटोंनी सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला. डेस्टिनेशन वेडिंग करत ही जोडी लग्नबंधनात अडकली. शाल्व व श्रेया यांच्या शाही विवाहसोहळ्याची सर्वत्र चर्चा झाली. अनेक वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते आता अखेर दोघांनी लग्न केले आहे. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व कलाकारांच्या उपस्थित त्यांचा हा शाही सोहळा संपन्न झाला.
शाल्व व श्रेया यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच एक खास स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये असं पाहायला मिळत आहे की, शाल्व व श्रेया लग्नानंतर पहिल्यांदाच डेटवर गेले आहेत. दोघांनी डेटचा फोटो शेअर केला आहे. एका रेस्टॉरंटमध्ये दोघेही गेलेले या फोटोमध्ये दिसत आहे. “नवरा बायको म्हणून पहिली डेट” असं कॅप्शन देत श्रेयाने शाल्वचा फोटो शेअर केला आहे. तर शाल्वनेही श्रेयाचा फोटो शेअर करत बायको असं म्हटलं आहे. या दोन्ही फोटोंमध्ये नववधूवर खूपच सुंदर दिसत आहेत.
आणखी वाचा – Tula Shikvin Changalach Dhada : अधिपतीनेच अक्षराला काढलं घराबाहेर, भुवनेश्वरीचा प्लॅन यशस्वी, मोठा ट्विस्ट

लग्नाच्या आधीच्या विधींसाठी शाल्वने पेशवाई पद्धतीचा ऑफ व्हाईट कुर्ता व त्यावर धोतर नेसलं होतं, तर श्रेयाने हिरव्या रंगाची सहावारी साडी आणि त्यावर गुलाबी ब्लाऊज परिधान केला आहे. तर लग्नात या दोघांनी लाल रंगाच्या लूकला पसंती दिली होती. सोशल मीडियावर शाल्व-श्रेया यांच्या लग्नातील खास क्षणांचा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
शाल्व सध्या ‘शिवा’ या मालिकेत आशु हे पात्र साकारताना दिसत आहे. या आधी तो ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत झळकला होता. ‘शिवा’ मालिकेतील आशु या पात्रामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. तर शाल्वची होणारी बायको श्रेया डफळापूरकर ही फॅशन डिझाइनर आहे. श्रेयाने आजवर अनेक सिनेइंडस्ट्रीतील कलाकारांचे फॅशन डिझाइनर म्हणून काम पाहिले आहे.