Tula Shikvin Changalach Dhada Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत एकामागोमाग एक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत सध्या अक्षराच्या बाजूने फासे न पडता भुवनेश्वरीचा विजय झालेला पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरीच चारुलता आहे हे सत्य अक्षराने सर्वांसमोर आणलेलं असतं, मात्र यामागे तिचा नेमका हेतू काय आहे हे सिद्ध कऱण्यात अक्षरा मागे पडते. यामुळे अधिपतीचा संताप होतो. अक्षरा अधिपतीला वेळोवेळी सत्य सांगण्याचा, सावध करण्याचा प्रयत्न करते मात्र आईवरील प्रेमाची डोळ्यावर पट्टी बांधून घेतल्याने तो बायकोवर विश्वास ठेवत नाही. तर एकीकडे तो अक्षराचा रागराग करु लागतो. तर भुवनेश्वरीही जाणून बुझून अक्षराला अधिपतीसमोर अडकवताना दिसते.
मालिकेत अक्षरा व अधिपती यांच्यात वाद पाहायला मिळत आहे. अधिपती अक्षराला असं म्हणतो की, “अजून काही काळ आपण एकत्र राहिलो तर एकमेकांचा जीव घेऊ. कुणीतरी गेलं पाहिजे”. यावर अक्षरा त्याला “मीच घर सोडून जाते” असं म्हणते. दोघांमधील या संभाषणानंतर अक्षरा घर सोडून जायला निघते. अक्षरा बॅग घेऊन खाली येते तेव्हा भुवनेश्वरी तिला अडवते आणि तिचा पाणउतारा करते. त्याचवेळी अधिपती येताना दिसतो तेव्हा ती मुद्दाम खोटेपणाचा आव आणून अक्षराबरोबर चांगलं वागण्याचं नाटक करते.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, भुवनेश्वरी अक्षराला म्हणते, “सूनबाई सूनबाई सूनबाई. तुम्ही आम्हाला घराबाहेर काढ्याचा विडा उचलला होता ना?. आणि आता तुम्हीच रस्त्यावर येण्याची वेळ आली”. इतक्यात अधिपती तिथे येतो. अधिपतीला पाहून भुवनेश्वरी रंग बदलते आणि अक्षरासमोर हात जोडते. अक्षरासमोर हात जोडून ती विनंती करताना दिसते की, “सूनबाई ऐका आमचं. हात जोडते तुमच्यासमोर, नका जाऊ”. हात जोडून विनंती करताच अधिपती भुवनेश्वरीला थांबवतो आणि म्हणतो, “आईसाहेब तुम्ही कशाला त्यांच्याम्होर हात जोडताय. त्यांना जायचं असेल तर जाऊद्या”.
आणखी वाचा – महागड्या Birthday Gift साठी संतोष जुवेकर कुशल बद्रिकेला मॉलमध्ये घेऊन गेला पण…; घडलं काही भलतंच, Video Viral
यावर अक्षराला धक्काच बसतो, ती म्हणते, “सरड्यालाही लाज वाटेल इतक्या पटकन तुम्ही रंग बदलताय”. आईचा होणारा अपमान पाहून अधिपती अक्षराला म्हणतो, “बस झालं मी ऐकून घेतलं मास्तरीणबाई. एवढं असेल तर नका थांबू जावा. चला मी सोडतो”, असं म्हणत अक्षराची बॅग घेऊन तो दरवाज्याच्या दिशेने जातो. त्यांनतर अक्षरा स्वतः बॅग घेऊन घरातून बाहेर पडताना दिसते. अक्षराने अखेर घराबाहेर पाऊल टाकलं असून ती आता अधिपतीपासून कायमची दूर होणार का हे सारं पाहणं रंजक ठरणार आहे.