बॉलिवूडचे शोमॅन म्हणून ओळखले जाणारे दिवंगत अभिनेते म्हणजे राज कपूर. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबाने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. १०० व्या जयंतीच्या कार्यक्रमाचे खास आमंत्रण देण्यासाठी अवघं कपूर कुटुंब मोदींच्या भेटीसाठी गेलं होतं. यावेळी नीतू कपूर, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, आलिया भट्ट, आदर जैन, अनीसा मल्होत्रा होते. या भेटीत कपूर कुटुंबातील सदस्यांनी मोदींशी संवाद साधला. या भेटीबद्दल अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने एका कार्यक्रमात आपलं मत व्यक्त केलं आहे. आपल्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी प्रसिद्ध असलेली ही अभिनेत्री अनेकदा बॉलिवूडवरही लक्ष केंद्रित करण्यात कमी पडत नाही. (Kangana Ranaut on Kapoor family PM Narendra Modi meet)
अशातच तिने कपूर कुटुंबीयांनी घेतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलीवूड स्टार्सची भेट घेतल्यावर बॉलिवूड इंडस्ट्री अनाथ झाल्याचं म्हटलं आहे. ‘आजतक’च्या ‘अजेंडा में बात’ कार्यक्रमात कंगना रणौत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना विचारलं की, सध्या फिल्म इंडस्ट्रीमधील कलाकारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत भेटताना दिसत आहेत. पण, काही दिवसांपूर्वी तुम्ही सांगितलं होतं, तुम्हाला पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी वेळ मिळत नाहीये. तर याबद्दल काय वाटतं?
आणखी वाचा – “मी तुझीच आहे आणि…”, नवऱ्याच्या वाढदिवसाला जिनिलीया देशमुखची रोमँटिक पोस्ट, शेअर केले Unseen Photos
याबद्दल अभिनेत्री म्हणाली की, “मला वाटतं, आपल्या सिनेसृष्टीला मार्गदर्शनाची खूप गरज आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी असो, आपले इतर नेते असो किंवा माहिती आणि प्रसारण मंत्रालय, मी २० वर्षांपासून या इंडस्ट्रीचा भाग आहे. मला वाटतं, ही इंडस्ट्री पूर्णपणे अनाथ झाली आहे. कारण त्यांच्याकडे मार्गदर्शन नाही. मग जिहादी अजेंडा असो किंवा पॅलेस्टिनी अजेंडा, यावर कोणीही वर्चस्व गाजवू शकत नाही. त्यांच्याजवळ कोणतेही मार्गदर्शन नाही, त्यांना कुठे जायचं आहे, हे माहीत नाही. फिल्म इंडस्ट्रीतील लोक असुरक्षित आहेत, ‘तुम्ही त्यांना (इंडस्ट्रीतील लोकांना) थोडे पैसे देऊन काहीही करायला लावू शकता”.
कंगना राणौत पुढे म्हणाली की, “दाऊद त्यांना त्याच्या पार्ट्यांमध्ये घेऊन जातो, त्यामुळे अनेकदा ड्रग्जच्या जाळ्यात अडकतात. हे खूप असुरक्षित आहे. त्यांना वाटतं की, आम्ही पंतप्रधानांना भेटलं पाहिजे. आम्हाला इतर इंडस्ट्री सारखी वागणूक मिळत नाही. आम्ही इतके सारे चित्रपट करतो, त्यातून इतका महसूल गोळा होतो…हां, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी विनंती केली आहे. एकेदिवशी ते मला बोलावतील आणि मी त्यांना भेटेन, अशी आशा आहे”.