Shalva Kinjavdekar And Shreya Dafalapurkar Mehandi : सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. तर ही लगीनघाई मराठी कलाविश्वातही सुरु झालेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी प्रेमाची जाहीर कबुली देत लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. अशातच मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘शिवा’ फेम अभिनेता शाल्व किंजवडेकर काही दिवसांत लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. शाल्वच्या घरी लगीनघाई सुरु झाली असल्याचं पाहायला मिळालं. अशातच शाल्व व श्रेया यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. दोघेही लग्नाआधीच्या त्यांच्या या कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.
शाल्व आणि त्याच्या बायकोच्या म्हणजेच श्रेयाच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो समोर आले आहेत. श्रेयाच्या हातावर शाल्वच्या नावाची मेहंदी लागलेली पाहायला मिळतेय. तर शाल्वनेही त्याच्या हातावर मेहंदीने श्रेयाचं नाव लिहिलेलं आहे. यावेळी दोघांनी खास मॅचिंग कपडे परिधान केलेले दिसले. मेहंदी सोहळ्यासाठी दोघांनी गुलाबी रंगाचा खास लूक केला आहे. श्रेयाने यावेळी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर शाल्वने गुलाबी रंगाचा मॅचिंग असा सदरा आणि त्यावर ओढणी असा डॅशिंग लूक केला आहे. दोघेही त्यांच्या या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात एन्जॉय करताना दिसत आहेत.

तसेच शाल्व व श्रेया यांच्या मेहंदी सोहळ्यातील काही खास व्हिडीओही समोर आले आहेत. या व्हिडीओमध्ये शाल्व त्याच्या मित्रमंडळीसह थिरकताना दिसत आहे. तर श्रेयानेही मेहंदीच्या हाताने ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. यावेळी शाल्वच्या हटके डान्स स्टेपने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. शाल्व व श्रेयाच्या मेहंदी सोहळ्यातील हे खास क्षण तुफान व्हायरल होत आहेत. दोन दिवसांपूर्वीच शाल्वच्या बायकोने ग्रहमखचे फोटो शेअर करत लगीनघाई सुरु झाल्याचं सांगितलं.
आणखी वाचा – गिरनार पर्वतावर पोहोचले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, दत्तगुरुंच्या सेवेसाठी नवऱ्यासह हजर, फोटो व्हायरल
शाल्व सध्या ‘शिवा’ या मालिकेत आशु हे पात्र साकारताना दिसत आहे. या आधी तो ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत झळकला होता. ‘शिवा’ मालिकेतील आशु या पात्रामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे. तर शाल्वची होणारी बायको श्रेया डफळापूरकर ही फॅशन डिझाइनर आहे.