शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझं ब्रेकअप झालं”, शाहरुख खानच्या लेकीने पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख, पोस्टवर बॉयफ्रेंडच्या आईनेही केली कमेंट

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 4, 2024 | 1:04 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shah Rukh Khan's daughter Suhana Khan shared post and saying that she has broken up

“माझं ब्रेकअप झालं”, शाहरुख खानच्या लेकीने पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दुःख, पोस्टवर बॉयफ्रेंडच्या आईनेही केली कमेंट

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची लेक सुहाना खानने आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मनोरंजन सृष्टीत पदार्पण केलं आहे. सध्या सिनेसृष्टीत सुहाना आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. आपला लूक व फॅशन स्टाइलने तिने चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडली आहे. काही महिन्यांपूर्वीच सुहाना खान हिचा ‘द आर्चिज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानंतर आता सुहाना खान तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करत तिचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले आहे.

सुहानाने शेअर केलेल्या या पोस्टवर सुहानाच्या कथित प्रियकराच्या आईने म्हणजेच अगस्त्य नंदाच्या आईनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, काहीही निष्कर्ष काढण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की, सुहानाने तिच्या साबणाबरोबर ब्रेकअप केला आहे. सुहाना नुकतीच ‘लक्स’या साबणाची ब्रँड ॲम्बेसेडर बनली आहे आणि याच साबणाच्या जाहिरातीचा एक व्हिडिओ शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “माझ्याकडे एक बातमी आहे, माझे ब्रेकअप झाले आहे”.

View this post on Instagram

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

आणखी वाचा – आकर्षक डिझाईन, सोन्याचा अधिकाधिक वापर अन्…; शरयू सोनावणेने डायमंडचा वापर न करता असं बनवून घेतलं मंगळसूत्र, डिझाईन आहे फारच खास

सुहानाने या पोस्टद्वारे खुलासा करत असं म्हटलं की, ती तिच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलत नसून ती तिच्या साबणाबद्दल बोलत आहे. सुहानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच तिचा कथित प्रियकर अगस्त्य नंदाची आई श्वेता बच्चन नंदाने तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया दिली. श्वेताने सुहानाच्या पोस्टवर हार्ट इमोजीची कमेंट केली आहे. सुहाना खान तिचे वडील शाहरुख खान यांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. कारण अभिनेता शाहरुख खान हादेखील ‘लक्स’चा ब्रँड ॲम्बेसेडर होता.

आणखी वाचा – पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर रुपालीचा डाव तिच्यावरच उलटला, केतकी-फाल्गुनी विरोचकाच्या रुममध्ये सापडल्यानंतर नेत्राला यश, नवा ट्विस्ट

दरम्यान, सुहाना खान नुकतीच झोया अख्तरच्या ‘द आर्चिज’ या चित्रपटात दिसली होती. ज्यामध्ये तिच्याबरोबर अगस्त्य नंदा व खुशी कपूरदेखील होते. सुहानाने ‘द ग्रे पार्ट’ या शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे. सुहाना आता लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत. 

Tags: Bollywood entertainment newsshah rukh khansuhana khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Next Post
shekhar suman on kangana ranaut

शेखर सुमनच्या लेकाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती कंगना रणौत, अभिनेत्रीकडून त्याचं शारिरीक शोषण, काळी जादू केल्याचे आरोप, काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.