‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. या मालिकेतून ऐश्वर्या या नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांच्या नकारात्मक भूमिकेनेही रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोशल मिडियावर ऐश्वर्या नारकर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावरून नेहमीच ते काही ना काही शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ऐश्वर्या यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Aishwarya Narkar Video)
ऐश्वर्या या फिटनेसच्या बाबतीतही खूप ऍक्टिव्ह असलेल्या पाहायला मिळतात. नेहमीच त्या फिटनेसचे व्हिडीओ चाहत्यांसह शेअरही करतात. पन्नाशी ओलांडल्यानंतरही ही अभिनेत्री तिचा फिटनेस नेहमीच जपताना दिसते. अनेकदा त्या त्यांचे पती अविनाश नारकर यांच्यासह योगा करताना दिसतात. याशिवाय त्या आरोग्याला पोषक आहाराचे सेवनही करताना दिसतात. ऐश्वर्या या डाएटच्या बाबतीतही नेहमीच काळजी घेताना दिसतात.
फिटनेस व विविध रेसिपींचे व्हिडीओ त्या नेहमीच शेअर करताना दिसतात. अशातच अभिनेत्रीने होळी स्पेशल बनवलेल्या एका खास पदार्थाच्या व्हिडीओने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऐश्वर्या नारकरांनी होळीसाठी स्पेशल ‘मखाना चुरमा’ बनवला आहे. मखाना भाजून त्याची पेस्ट करत बनवलेला हा ‘मखाना चुरमा’ त्यांच्या यंदाच्या होळीसाठी स्पेशल आहे. यामध्ये अभिनेत्रीने मखाण्यासह सुकामेवा, खजुर इत्याही पदार्थांचं एकत्रित मिश्रण केलं. अभिनेत्रीने या व्हिडीओला “होली स्पेशल, तुम्ही सुद्धा हा पदार्थ जरूर करुन पाहा” असं कॅप्शन दिलं आहे.
“कधी यायचं तुमच्या हातचं खायला”, “फिटनेसचं रहस्य आलं समोर”, अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर चाहत्यांनी केलेल्या पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्या या फिटनेससाठी नेहमीच पोषक असे पदार्थ बनवत असतात. आरोग्याला पोषक अशा रेसिपींचे व्हिडीओ त्या त्यांच्या इन्स्टाग्राम व युट्यूब चॅनेलवर शेअरही करतात.