मराठी मनोरंजन विश्वातील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश त्यांच्या लग्नानंतर बरेच चर्चेत आलेले पाहायला मिळाले. लग्नानंतर ही जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली पाहायला मिळाली. सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत ही जोडी चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. नोव्हेंबर महिन्यात मुग्धा व प्रथमेश यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. (Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate)
लग्नाला तीन महिने पूर्ण होताच मुग्धा व प्रथमेश यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केलेली एक पोस्ट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाचे व लग्नापूर्वीच्या समारंभाचे फोटो, व्हिडीओही विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळाले. अशातच लग्नाला तीन महिने पूर्ण होताच दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यांत त्यांनी लग्नाला तीन महिने पूर्ण होताच गोव्यातील मंदिरात जाऊन आणि प्रथमेश मूळ गावच्या आरवली येथील दत्त मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले आहेत.
या दर्शनादरम्यानचा मंदिरा बाहेरील फोटो शेअर करत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये, “कालच आमच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले. याच निमित्ताने आज गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महराजांचं दर्शन घेतलं. हेची घडो मज जन्मजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे”, असं म्हटलं आहे. यावेळी दोघांचा पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरला.
मुग्धा-प्रथमेशच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर काहींनी कमेंट करत दोघांचं कौतुकही केलं आहे. दरम्यान एका नेटकऱ्याने मुग्धाच्या मंगळसूत्रावरून केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे. “मंगळसूत्र उलट आहे की काय अजून?”, असं म्हटलं आहे. या कमेंट दुसऱ्या एका चाहतीने कमेंट करत, “आमच्यात लग्नाला १ वर्ष किंवा पहिला गुढीपाडवा यापैकी जे आधी येईल त्या वेळेला मंगळसूत्र सरळ करतात” असं म्हणत शंकेचं निरसन केलं आहे.