बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सणांमध्येही फिटनेसची अशी काळजी घेतात ऐश्वर्या नारकर, होळी स्पेशल पदार्थ बनवला पण…; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 23, 2024 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar Video

सणांमध्येही फिटनेसची अशी काळजी घेतात ऐश्वर्या नारकर, होळी स्पेशल पदार्थ बनवला पण...; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले...

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. या मालिकेतून ऐश्वर्या या नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळत आहेत. त्यांच्या नकारात्मक भूमिकेनेही रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सोशल मिडियावर ऐश्वर्या नारकर नेहमीच सक्रिय असतात. सोशल मीडियावरून नेहमीच ते काही ना काही शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ऐश्वर्या यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. (Aishwarya Narkar Video)

ऐश्वर्या या फिटनेसच्या बाबतीतही खूप ऍक्टिव्ह असलेल्या पाहायला मिळतात. नेहमीच त्या फिटनेसचे व्हिडीओ चाहत्यांसह शेअरही करतात. पन्नाशी ओलांडल्यानंतरही ही अभिनेत्री तिचा फिटनेस नेहमीच जपताना दिसते. अनेकदा त्या त्यांचे पती अविनाश नारकर यांच्यासह योगा करताना दिसतात. याशिवाय त्या आरोग्याला पोषक आहाराचे सेवनही करताना दिसतात. ऐश्वर्या या डाएटच्या बाबतीतही नेहमीच काळजी घेताना दिसतात.

आणखी वाचा – मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या लग्नाला ३ महिने पूर्ण, गोव्याला गेले, दत्तगुरुंचे दर्शनही घेतलं अन्…; फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

फिटनेस व विविध रेसिपींचे व्हिडीओ त्या नेहमीच शेअर करताना दिसतात. अशातच अभिनेत्रीने होळी स्पेशल बनवलेल्या एका खास पदार्थाच्या व्हिडीओने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऐश्वर्या नारकरांनी होळीसाठी स्पेशल ‘मखाना चुरमा’ बनवला आहे. मखाना भाजून त्याची पेस्ट करत बनवलेला हा ‘मखाना चुरमा’ त्यांच्या यंदाच्या होळीसाठी स्पेशल आहे. यामध्ये अभिनेत्रीने मखाण्यासह सुकामेवा, खजुर इत्याही पदार्थांचं एकत्रित मिश्रण केलं. अभिनेत्रीने या व्हिडीओला “होली स्पेशल, तुम्ही सुद्धा हा पदार्थ जरूर करुन पाहा” असं कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा – “नीट वागा, इथून बाहेर जा”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’च्या स्क्रिनिंगदरम्यान फोटोग्राफर्सवर भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली, “थोडी तरी…”

“कधी यायचं तुमच्या हातचं खायला”, “फिटनेसचं रहस्य आलं समोर”, अशा अनेक कमेंट या व्हिडीओवर चाहत्यांनी केलेल्या पाहायला मिळत आहेत. ऐश्वर्या या फिटनेससाठी नेहमीच पोषक असे पदार्थ बनवत असतात. आरोग्याला पोषक अशा रेसिपींचे व्हिडीओ त्या त्यांच्या इन्स्टाग्राम व युट्यूब चॅनेलवर शेअरही करतात.

Tags: aishwarya narkarAishwarya Narkar Videomarathi actressmarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
kriti kharbanda on pulkit samrat

पुलकित सम्राटच्या बॅगमध्ये नेहमीच सॅनिटरी पॅड व टॅम्पोन, बायकोनेच केला खुलासा, म्हणाली, "डेटिंग करतानाच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.