बॉलीवूडमधील अनेक जोड्या या वर्षी लग्नबंधनात अडकल्या. त्यातील एक जोडी म्हणजे अभिनेता पुलकित सम्राट व अभिनेत्री कृती खरबंदा. १५ मार्च रोजी दोघांनी दिल्ली-एनसीआरमध्ये लग्न केले. पुलकित व कृती हे गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते. पण दोघांनीही आपले नाते कधीही माध्यमांसमोर येऊ दिले नाही. त्यांच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. लग्नाची बातमी सर्वांना समजल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अशातच कृतीने पुलकितबद्दल एक खुलासा केला आहे ज्यामुळे सगळ्यांनीच त्याचे कौतुक केले आहे. (kriti kharbanda on pulkit samrat)
कृती व पुलकित यांच्या डेटिंगच्या बातमीनंतर कृतीने पुलकितबद्दल एका मुलाखतीमध्ये तिने एक खुलासा केला होता. पुलकित नेहमी त्याच्या बॅगमध्ये एक सॅनिटरी नॅपकिन व टॅम्पोन घेऊन फिरतो. तसेच मासिक पाळीच्या वेळी तिची कशा प्रकारे काळजी घेतो हे देखील सांगितले होते.
ती म्हणाली की, “पुलकित नेहमी आपल्या बॅगेमध्ये एक सॅनिटरी पॅड व टॅम्पोन असते. तसेच तो माझी माझी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये खूप काळजीदेखील घेतो. हे मी त्याला डेट करत आहे म्हणून नाही तर मी जेव्हा त्याची मैत्रीण होते तेव्हा देखील असेच तो माझ्याशी वागायचा”.
पुढे ती म्हणाली की, “तो केवळ माझीच नाही तर इतर मैत्रिणी, बहिणी यांचीही तो अशीच काळजी घेतो”. तिने हा खुलासा केल्यानंतर सोशल मीडियावर पुलकितचे मोठ्या प्रमाणात कौतुक होताना दिसत आहे. कृतीबरोबर लग्न होण्याआधी त्याने सलमान खानची बहीण श्वेता रोहिराबरोबर २०१४ साली लग्न केले होते. पण काही कारणांमुळे दोघांमध्ये मतभेद झाल्याने ते विभक्त झाले.
कृतीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘शादी मे जरूर आना’, ‘हाऊसफुल ४’, ‘राज रीबुट’, पागल पंती’, ‘१४ फेरे’ , ‘गुगली’ या चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्यातील राजकुमार राव बरोबर केलेला ‘शादी मे जरुर आना’ या चित्रपटातील भूमिकेचे तीचे विशेष कौतुक केले गेले.