शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Satvya Mulichi Satavi Mulgi : केदारच्या गायब असण्यामागे होता शेखरचा हात, केदारचे त्याच्यावर गंभीर आरोप, राजाध्यक्ष विश्वास ठेवणार का?

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 6, 2024 | 12:02 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi Serial Updates, Kedar makes serious accusations against Shekhar for his kidnapping.

केदारचे शेखरवर गंभीर आरोप, राजाध्यक्ष कुटुंबीय केदारवर विश्वास ठेवणार का?

atvya Mulichi Satavi Mulgi Serial : झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. रहस्यमय कथानकामुळे आणि मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत केदार या पात्राची एन्ट्री झाली. मालिकेत केदार या पात्राची एन्ट्री झाल्यापासून मालिकेला एक नवीन वळण आले आहे. केदार या पात्रामुळे कथानक वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. केदारची भूमिका अभिनेता अभिजीत केळकरने साकारली आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi Serial Updates)

केदारच्या येण्याने मात्र शेखरच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसतात. यामागचं गुपित अद्याप उलगडलेलं नाही. पण शेखर केदारच्या म्हणण्याप्रमाणे वागत आहे. केदारने शेखरकडे पैशांची मागणी केली असून केदारच्या म्हणण्याप्रमाणे शेखर त्याला पैसे देत आहे. शेखरने हे सर्व घरच्यांपासून लपवून ठेवलं होतं. पण अखेर शेखरची ही वागणूक आता सर्वांसमोर आली आहे. याचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे आगामी नवीन कथानकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Sharda Sinha Passed Away : सुप्रसिद्ध गायिका शारदा सिन्हा यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूशी झुंज अपयशी

या नवीन प्रोमोमध्ये अद्वैत घरातील सर्वांना सांगतो की, “बाबांनी चार दिवसांपूर्वी १५ लाख रुपये आणि आता २५ लाख रुपये मागितले”. यावर शेखर ते पैसे केदारला हवे होते असं सांगतो. पुढे केदार शेखरला मी तुझ्याकडे पैसे मागितले नसल्याचे म्हणतो. यावर शेखर त्याला “आता तरी खरं बोल” असं म्हणतो. त्यानंतर केदार त्याला असं म्हणतो की, “गेली २६ वर्षे तूच सर्वांची खोटं वागत आहेस. रुपाली म्हात्रेने मला किडनॅप केलं होतं. पण त्यामागे तुझा हात होता”.

आणखी वाचा – Video : ट्रॅक्टर चालवला, शेतामध्ये फिरली अन्…; सूरज चव्हाणने जान्हवीला दाखवलं त्याचं संपूर्ण गाव, व्हिडीओ व्हायरल

मालिकेच्या या नवीन प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. यामुळे आता केदारच्या गायब होण्यामागे शेखरचा नेमका कसा हात आहे. हे आता लवकरच समोर येणार आहे. केदारच्या येण्याने घरात सगळे आनंदी असताना, इंद्राणीला शंका येते की शेखर काहीतरी लपवत आहे. याबद्दल ती नेत्राशी बोलते आणि नेत्रा सावध होते. त्यामुळे आता मालिकेच्या आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: Marathi Serial UpdatesSatvya mulichi satavi mulgiSatvya Mulichi Satavi Mulgi Marathi Serial
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Kareena Kapoor Troll

"इतका गर्व कुठून आला?", करीना कपूरची चाहतीबरोबरची वागणूक पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, "अहंकार…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.