Kareena Kapoor Troll : बॉलिवूड स्टार कपल करीना कपूर व सैफ अली खान नेहमीच चर्चेत असतात. ते त्यांच्या मुलांबरोबर अनेकदा स्पॉट होताना दिसतात. सध्या हे खान कुटुंबं मालदीवमध्ये सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटताना दिसले. मालदीवला एन्जॉय केल्यानंतर हे कुटुंब मुंबईला परतले आहे. करीन व सैफ नुकतेच तैमूर व जेह या त्यांच्या मुलांबरोबर विमानतळावर दिसले. जिथे एका मुलीने करिनाला फोटोसाठी विनंती केली, पण अभिनेत्रीने स्पष्टपणे नकार दिला. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वजण ‘बेबो’वर नाराज असून तिच्या वागण्यावर टीका करत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये करीना कपूरने जेहचा हात पकडला आहे. सैफ अली खान त्यांच्याच पुढे चालत आहे आणि तैमूर अली खानही त्याच्याबरोबर आहे. एका मुलीने सेल्फीची विनंती केल्यावर करीना तिच्या कारकडे जाताना दिसत आहे. चाहतीच्या विनंतीवर करीना लगेच म्हणाली, “नाही”. आणि मग ती तिच्या गाडीत बसते आणि निघून जाते.
आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने थेट गोव्यात उभारला आलिशान बंगला, फोटो समोर
करीना कपूर खानचे हे वागणे नेटकऱ्यांना काही पसंत पडलेले नाही. एकाने लिहिले आहे की, “करीना गर्वाची शिकार झाली आहे”. दुसऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “हिच्यात इतका गर्व कुठून आला आहे”. तर अनेकजण असे म्हणताना दिसत आहेत की, “करीनाला इतका अहंकार का आहे?”. करीनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर २००० साली ‘रिफ्युजी’ चित्रपटातून इंडस्ट्रीत एंट्री करणारी करीना १ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसली होती.
रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात अजय देवगण, रणवीर सिंग, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर यांच्याही भूमिका आहेत. सलमान खानचाही एक कॅमिओ आहे. सैफबद्दल सांगायचे तर, ‘देवरा: पार्ट १’ नंतर तो ‘ज्वेल थीफ: द रेड सन चॅप्टर’मध्ये दिसणार आहे. यामध्ये तो राजा चौहानच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे.