atvya Mulichi Satavi Mulgi Serial : झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका गेले काही दिवस प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. रहस्यमय कथानकामुळे आणि मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची आवडती मालिका होत आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत केदार या पात्राची एन्ट्री झाली. मालिकेत केदार या पात्राची एन्ट्री झाल्यापासून मालिकेला एक नवीन वळण आले आहे. केदार या पात्रामुळे कथानक वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. केदारची भूमिका अभिनेता अभिजीत केळकरने साकारली आहे. (Satvya Mulichi Satavi Mulgi Serial Updates)
केदारच्या येण्याने मात्र शेखरच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले दिसतात. यामागचं गुपित अद्याप उलगडलेलं नाही. पण शेखर केदारच्या म्हणण्याप्रमाणे वागत आहे. केदारने शेखरकडे पैशांची मागणी केली असून केदारच्या म्हणण्याप्रमाणे शेखर त्याला पैसे देत आहे. शेखरने हे सर्व घरच्यांपासून लपवून ठेवलं होतं. पण अखेर शेखरची ही वागणूक आता सर्वांसमोर आली आहे. याचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे आगामी नवीन कथानकाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये अद्वैत घरातील सर्वांना सांगतो की, “बाबांनी चार दिवसांपूर्वी १५ लाख रुपये आणि आता २५ लाख रुपये मागितले”. यावर शेखर ते पैसे केदारला हवे होते असं सांगतो. पुढे केदार शेखरला मी तुझ्याकडे पैसे मागितले नसल्याचे म्हणतो. यावर शेखर त्याला “आता तरी खरं बोल” असं म्हणतो. त्यानंतर केदार त्याला असं म्हणतो की, “गेली २६ वर्षे तूच सर्वांची खोटं वागत आहेस. रुपाली म्हात्रेने मला किडनॅप केलं होतं. पण त्यामागे तुझा हात होता”.
मालिकेच्या या नवीन प्रोमोने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. यामुळे आता केदारच्या गायब होण्यामागे शेखरचा नेमका कसा हात आहे. हे आता लवकरच समोर येणार आहे. केदारच्या येण्याने घरात सगळे आनंदी असताना, इंद्राणीला शंका येते की शेखर काहीतरी लपवत आहे. याबद्दल ती नेत्राशी बोलते आणि नेत्रा सावध होते. त्यामुळे आता मालिकेच्या आगामी कथानकाविषयी प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.