रहस्यमय कथानक, नवनवीन ट्विस्ट्स व कलाकारांच्या उत्तम अभिनयाने छोट्या पडद्यावरील एका मालिकेने सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे ऐ ही मालिका म्हणजे ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट्स दिवसेंदिवस मालिकेची उत्सुकता वाढवत आहेत. गेले काही दिवस या मालिकेत अनेक नवीन ट्विस्ट येत आहेत. अशातच रुपालीच्या अंताने मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळत आहे.
मालिकेत नुकताच नेत्राने विरोचकाचा वध केल्याचे पाहायला मिळाले. अद्वैतला विरोचकाच्या तावडीतून सोडवताना नेत्रा विरोचकाचा वध करते. मात्र, यामुळे विरोचकाचा अंत होत नाही. यानंतर विरोचक पुन्हा जीवंत होते आणि तिला दक्षिण दिशेकडे कुणीतरी बोलवतानाचे पाहायला मिळाले आहे. आशातच आता विरोचकाला संमोहन शक्तीदेखील मिळाली आहे. ज्याचा विरोचक राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध वापर करत आहे.
नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये विरोचकाने केतकी राजाध्यक्षला संमोहित केल्यामुळे ती स्वत:वर चाकू उगारत आहे. त्यामुळे तिला वाचवायला जाताना ती राजाध्यक्ष कुटुंबीयांना जवळ न् येण्याची धमकीही देते. यानंतर देवी आईची लेकी नेत्रा व इंद्राणी विरोचकालचा गळा पकडत तिला मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र विरोचकाच्या शक्तीमुळे ती त्यांच्या हातून सुटते.
तसेच या प्रोमोमध्ये रुपाली केतकीला “आता विरोचक जे बोलणार तेच घडणार. आता तुझा आत्मा, तुझं शरीर विरोचकाच्या ताब्यात आहे.” त्याचबरोबर रुपाली नेत्राला “ही तर सुरुवात आहे, आताअ बघ पुढे पुढे काय होतं.” असा इशाराही देते. त्यामुळे आता विरोचकांच्या या शक्तीविरुद्ध नेत्रा-इंद्राणीसह राजाध्यक्ष कुटुंबीय कसे लढणार?, नेत्रा विरोचकाच्या या शक्तीविरुद्ध कशी लढणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.