शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“राजकारण्यांनी पैसे खाल्ले अन्…” सध्याच्या राजकारणावर अवधूत गुप्ते स्पष्टच बोलला, म्हणाला, “ही सामान्य माणसांची चूक…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 25, 2024 | 11:29 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Avadhoot Gupte said that the common man is responsible for caste politics and corruption.

“राजकारण्यांनी पैसे खाल्ले अन्...” सध्याच्या राजकारणावर अवधूत गुप्ते स्पष्टच बोलला, म्हणाला, “ही सामान्य माणसांची चूक...”

महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वत्र राजकीय सभांचं भाषणांचं वातावरण आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर व विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच सध्याची राजकीय परिस्थितीवर सामान्य माणूसदेखील सहभाग घेत आहेत. अशातच अनेक कलाकार मंडळीदेखील या राजकीय परिस्थितीवर आपली मतं व्यक्त करत आहेत. अशातच गायक, संगीतकार, कवी, दिग्दर्शक अवधूत गुप्तेने सध्याच्या या राजकीय परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

अवधूत गुप्तेंनी नुकतीच मित्रम्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत अवधूतला सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत अवधूतने असं म्हटलं की, “हे सगळे राजकारणी स्वत:चं म्हणतात की राजकारणाचा स्तर खाली गेला आहे. आता तो खाली गेला आहे म्हणजे काय की ज्या गोष्टीची पूर्वीच्या समाजाला किंवा राजकारणाऱ्यांना लाज वाटायची किंवा जी गोष्ट पूर्णत: अस्वीकारार्ह होती ती आता पूर्णपणे स्वीकारार्ह झाली आहे. एखाद्या नेत्याने किंवा मंत्र्याने पैसे खाल्ले किंवा तो खातो. ही गोष्ट आता सामान्यातल्या सामान्य माणसाला मान्य झाली आहे. हा या व्यवस्थेचाच एक भाग झाला आहे.”

View this post on Instagram

A post shared by Avadhoot???? Gupte???? (@avadhoot_gupte)

आणखी वाचा – लग्नाला दोन महिने पूर्ण होताच प्रथमेश परबने शेअर केला सर्वात सुंदर व्हिडीओ, रंगतेय चर्चा, म्हणाला, “पडद्यावर आयुष्य घडतं तसा हा आंतरपाट…”

यापुढे त्याने जातीच्या राजकरणाबद्दल असं म्हटलं की, “आता जातीच्या राजकारणाला ते (नेते, राजकीय मंडळी) जबाबदार नाहीत, जबाबदार आपण आहोत. आपण सामान्य माणसं आहोत. प्रत्येकाला लायकीप्रमाणे सरकार मिळतं असं जे वाक्य म्हटलं आहे ते खरंच आहे. आजही अमुक जातीची, अमुक समाजाची वोट बँक आहे. ही वोट बँक कोणी केली, ही वोट बँक आपणच दिली ना. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरदेखील या देशात वोट बँक्स आहेत. तर ही सामान्य माणसांचीच चूक आहे. ही राजकीय लोकांची चूक नाही”.  

आणखी वाचा – राजकीय परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या संकर्षण कऱ्हाडेच्या कवितेने वेधलं लक्ष, ऐकून तुम्हीही व्हाल थक्क, म्हणाला, “असं करत एक मत वाया गेलं”

दरम्यान, अवधूत गुप्तेने आजवर ‘मोरया’, ‘झेंडा’, ‘एक तारा’ तसेच ‘कान्हा’सारख्या चित्रपटातून महाराष्ट्रातील सण-समारंभ व राजकारणावर भाष्य केले आहे. संगीतकार आणि गायक म्हणून त्याने मराठी संगीत विश्वाला एकापेक्षा एक सरस गाणी दिली. त्याच्या अनेक रॉकिंग अल्बमनी तरुणाईला अक्षरश: वेड लावले होते. शिवाय त्याने सिनेदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही जबाबदारी निभावली आहे.

Tags: avadhoot guptemarathi entertainment newspolitics
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Mrunmayee Deshpande Husband Farming Photo

महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर मृण्मयी देशपांडेच्या नवऱ्याने केली कांद्यांची शेती, कांदे कापणीचा फोटो शेअर करत दाखविली झलक, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.